28 C
Mumbai
Friday, March 29, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeEntertainmentसंजय जाधव यांनी सुरू केले फिल्मॅजिक फिल्मस्कूल

संजय जाधव यांनी सुरू केले फिल्मॅजिक फिल्मस्कूल

२०२० हे साल आयुष्य पूर्णतः लॉकडाऊन झाल्याप्रमाणेच गेले. धावणारी सृष्टी कुठेतरी थांबली. सर्व जग एका मोठ्या महामारीच्या विळख्यात सापडले. जसे सर्व सामान्यांचे आयुष्य वेठीस धरले गेले तसेच कला सृष्टीतील कलाकारांचे जीवनाला सुद्धा कुठेतरी स्टोप लागला. कोरोनामुळे जवळजवळ गेले ८ महिने पूर्ण जग विस्कळीत झाले होते. हळूहळू का होईना जीवन पूर्ववत व्हायला सुरुवात झाली आहे. सिनेसृष्टी म्ह्टली कि, आपल्या डोळ्यासमोर येते विविध कलाकार, काही आवडते तर काही नावडते. रोजच्या विविध मालिका तर वयोवृद्धांच्या गळ्यातील ताईत झालेल्या असतात. आणि या कोरोन महामारीच्या काळात तर सर्व मालिका, चित्रपट यांचे चित्रीकरण पूर्णतः बंद झाले होते. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कलाकार मंडळी ही एक प्रकारे क़्वारनटाईन झाली होतीत. परंतु अभिनेता आणि दिग्दर्शक संजय जाधव यांनी नवोगतांना एक विशेष संधी उपलब्ध करून दिली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक संजय जाधव यांनी फिल्मॅजिक या फिल्मस्कूल ची निर्मिती केली आहे. आणि अर्थातच अनेक कलाकारांनी प्रत्यक्ष सेटवर उपस्थीत राहून संजय जाधव यांना शुभेच्छा दिल्या. संजय जाधव यांचे फिल्म्गुरू आणि मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते ज्यांनी बॉलीवूड मध्येही तितकेच विशेष स्थान निर्माण केले आहे असे सचिन पिळगावकर यांच्या हस्ते फिल्मॅजिक या स्कूलचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी संजय जाधव यांना शुभेच्छा देताना सांगितले कि, संजयची कारकीर्द मी खूप काळापासून पाहतो आहे, त्याने घेतलेल्या मेहनतीचे फळ आज फिल्मॅजिकच्या रूपाने सर्वांनी पहिले आहे. स्वतः:चे करिअर घडवताना त्याने स्वतः खूप मेहनत घेतली आहे त्यामुळे त्याच्या नेतृत्वाने फिल्मॅजिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना नक्कीच स्वत:चे करिअर घडवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

संजय जाधव यांनी आपल्या फिल्मॅजिक या फिल्मस्कूल स्थापनेविषयी थोडक्यात माहिती दिली. ते म्हणाले कि, सिनेसृष्टीत प्रवेश करायचा म्हणजे काही साधी गोष्ट नाही. स्वत:ला जगासमोर प्रेझेंट करण्यासाठी विशेष मार्गदर्शन आणि परिश्रमाची जोड आवश्यक असते. कलाकार म्हणून स्टेजवर वावरताना आत्मविश्वासाची गरज असते, आणि तोच आत्मविश्वास त्याचप्रमाणे संभाषण कौशल्य, शारिरीक लकब, सिनेजगताला साजेशा भाषेचे ज्ञान, संवादाची फेक, आवाजाची लय बद्धता, योग्य वेळी मारायचा पंच अशा एक ना अनेक गोष्टी या स्कूलच्या माध्यमातून शिकायला मिळायचा वाव मिळणार आहे. मी स्वतः अनुभवातून शिकून इथवर पुढे आलो आहे. कोणतीही नवीन गोष्ट करायची म्हटल्यावर भांबावून जायला होणारच, म्हणून या सिनेसृष्टीत नवीन येणाऱ्या पिढीला आत्मविश्वासाने पाउल रोवण्यासाठी तसेच विविध तंत्रज्ञानाचा केला जाणारा वापर याचे सखोल ज्ञान फिल्मॅजिकमधून विद्यार्थ्यांना नक्कीच देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे या स्कूलचे वैशिष्ट्य आहे कि, येथे प्रवेशासाठी कसलीच बंधने नाहीत, ना वय, ना शिक्षण आणि ना भाषा. कोणत्याही भाषेच्या, वयाच्या आणि शैक्षणिक पात्रतेच्या व्यक्तीला येथे प्रवेश मिळेल.

फिल्मॅजिकच्या उद्घाटन सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये अंकुश चौधरी, सोनाली खरे, सई ताम्हणकर, श्रेय बुगडे, संजय नार्वेकर, उमेश कामत, मानसी साळवी, स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित, सिद्ध जाधव, संगीततज्ञ अमितराज आणि पंकज पडघन, दिग्दर्शक केदार शिंदे, अभिजित पानसे , विजू माने नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव इत्यादींची विशेष उपस्थिती लाभली. उपस्थित कलाकारांनी फिल्मॅजिक स्कूलला आणि संजय जाधव यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा देताना आपल्या काळातील अनुभव सांगून फिल्मॅजिक स्कूलला शुभेच्छा दिल्या. पाहूया काही अनुभव.

अंकुश चौधरी म्हणाला, संजय जाधव आणि त्याच नात आभाळमाया मालिकेपासून आहे. आणि आजपर्यंत मी त्याच्याकडून खूप शिकत आलो आहे. त्याच नवोदितांना मिळणारे मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरेल.

सई म्हणते, मराठी माणसाचे हे स्कूल निर्माण करण्याचे पाऊल नक्कीच कौतुक आणि अभिमानास्पद आहे. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल.

स्वप्नील जोशी म्हणतो, संजय जाधव जेवढा चांगला कलाकार , दिग्दर्शक, आणि निर्माता आहे तेवढाच तो अतिशय सुंदर शिक्षक पण आहे.

उमेश कामत म्हणतो कि, आयुष्याला योग्य दिशा मिळण्यासाठी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन आवश्यक असते, आणि संजय दादासारख्या ऑल रौंडर व्यक्तीकडून मिळालेल मोलाच मार्गदर्शन हे अमुल्यच असेल.

अशाप्रकारे विविध सिनेकलाकारांनी आपल्याला आलेले अनुभव कथन करून अभिनेता आणि दिग्दर्शक संजय जाधव यांच्या फिल्मॅजिक फिल्म स्कूलला शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

Most Popular