31 C
Mumbai
Friday, May 24, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeIndia Newsआयटी कंपनी विप्रोचे सर्वेसर्वा अझीम प्रेमजी यांची कोरोनाच्या महामारीमध्ये लक्षणीय मदत

आयटी कंपनी विप्रोचे सर्वेसर्वा अझीम प्रेमजी यांची कोरोनाच्या महामारीमध्ये लक्षणीय मदत

जगप्रसिद्ध आयटी कंपनी अशी ख्याती असणाऱ्या विप्रोचे सर्वेसर्वा अझीम प्रेमजी हे या 2020 सालातील सर्वात दानशूर भारतीय व्यक्ती ठरले आहेत. देशभरा मध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे मदत म्हणून मागील संपत्तीपैकी ७,९०४ कोटी रुपयांचे दान केले आहे, या गोष्टीचा जर हिशोब लावला असता, त्यांनी प्रतिदिनी सुमारे २२ कोटी रुपयांचे दान केल्याचे लक्षात आले आहे. भारतातील सर्वात दानशूर व्यक्तींची यादी ह्युरन इंडियाने तयार केल आहे. त्यामध्य विप्रो समूह उद्योगाचे संस्थापक अझीम प्रेमजी हे प्रथम क्रमांकावर आहेत.

भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या काळात म्हणजे 1 एप्रिल रोजी अझीम प्रेमजी यांनी कोरोनाविराधातील लढाईसाठी १,१२५ कोटी रुपयांची मदत केली होती. ही रक्कम विप्रोच्या वार्षिक CSR फंडाच्या आणि त्यांच्या इतर समाजकार्याच्या व्यतिरिक्त होती. ह्युरन इंडियाचे संचालक आणि मुख्य संशोधक अनस रेहमान जुनैद यांनी सांगितले की, अझीम प्रेमजी हे भारतीय मानवतावादी कार्य करणाऱ्या लोकांसाठी आदर्श आहेत त्याचप्रमाणे नवनवीन उद्योजकांनाही ते प्रेरणास्थान असून अशा प्रकारचे कार्य करण्यास ते कायम प्रेरणा देत असतात.

त्यानंतर दुसरी आय टी कंपनी HCL टेक्नॉलॉजीचे शिव नाडर हे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येतात. त्यांनी सुद्धा सामाजिक कार्यासाठी ७९५  कोटी रुपायांचे दान केले आहेत. त्याचप्रमाणे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती समजण्यात येणाऱ्या आणि रिलायन्स इंडियाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी आज पर्यंत ४५८ कोटी रुपये दान केले आहे. त्याचप्रमाणे रिलायन्सने PM CARE फंडासाठी ५००. कोटी रुपयांची मदत केली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि गुजरातच्या निधीसाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांची देणगी दिलेली.

त्यानंतर कुमार मंगलम बिर्ला यांनी सामाजिक कार्यासाठी २७६ कोटी रुपये खर्च करुन या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. तर पाचव्या स्थानी २१५ कोटी रुपयांचे दान करून वेदांत समुहाचे संस्थापक अनिल यांनी स्थान पटकावले. ह्युरन इंडियाने या यादीत भारतीय उद्योगपतींनी 2020 या सालामध्ये  सामाजिक कार्यासाठी केलेल्या दानधर्माची माहिती सांगितली आहे. अशा भारतीय उद्योजकांचा आम्हाला कायमच सार्थ अभिमान राहील.

- Advertisment -

Most Popular