26 C
Mumbai
Friday, July 19, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeTech Newsकाय आहे ब्लूटी ईबी ?

काय आहे ब्लूटी ईबी ?

कंपनीने ब्लूटी ईपी ५०० प्रोच्या यशानंतर फ्लॅगशिप मॉडेल प्रमाणेच यूजेबिलिटी प्रदान करणारा एक छोटे पावर स्टेशन सादर केले आहे. ब्लूटी ईबी हे ७० वॅट्सचे असून २०० पॉवर वॅट्स आउटपुट सपोर्ट करते. विशेष म्हणजे हे एकपेक्षा अधिक स्रोतांद्वारे कुठेही रिचार्ज करता येऊ शकते. हे इको-फ्रेंडली सौर जनरेटर आहे व ते २००W फोल्डेबल आणि सोबतच पोर्टेबल सौर पॅनेल प्रदान करते. त्याचा लूक रेडिओसारख असून, हे डिव्हाईस नेमके काय कार्य करते, कसे करते, भारतीय बाजारपेठेत त्यांची  किंमत आणि इत्यादी बद्दल माहिती जाणून घेऊया.

ब्लूटी ईबी ७० एक पोर्टेबल पॉवर स्टेशन असून ते फायर प्रूफ एबीएस+ पीसी सामग्रीसह संरक्षित केलेले आहे. हे तीन वेगवेगळ्या रंगात अर्थात स्टील ग्रे, ग्रीन आणि केमाइन मध्ये येते. याला एक  हँडल दिलेले असल्याने याची सहज आपणाला कुठेही ने आण करता येते. हे जुन्या काळातील रेडिओसारखे दिसत असून, यामध्ये ४ एसी आउटलेट्स दिले गेले आहेत जे ७०० डब्ल्यू पॉवर आउटपुट देतात. कंपनीचे म्हणणे आहे की घराबाहेर कोठेही पिकनिक, ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि कोण्याही प्रवासामध्ये वापरण्यासाठी हे एक उत्तम डिव्हाईस आहे.

पॉवर स्टेशनच्या पुढील पॅनेलवर अनेक एसी/डीसी आउटलेट्स दिले गेले आहेत. याद्वारे आपल्या घरातील आवश्यक असणारी एसी उपकरणे चालवण्यास मदत होऊ शकेल. तसेच, त्यामध्ये लॅपटॉप आणि अन्य अ‍ॅक्सेसरीज चार्जिंग करण्यासाठी १०० W यूएसबी-सी पोर्टची सुविधा देण्यात आली आहे. म्हणजेच, पिकनिक, कॅम्पिंग, ट्रेकिंग आणि प्रवासादरम्यान वेगवेगळ्या उपकरणांसाठी पर्याय म्हणून हे एकच डिव्हाईस सोबत घेतले कि, टेन्शन नाही. २०० डब्ल्यू एमपीपीटी सौर चार्जिंग असल्याने बॅटरी ४ तासामध्ये फुल चार्ज होऊ शकते. यामध्ये एमपीपीटी आणि शुल्क नियंत्रकाची मांडणी केलेली  आहे, जो युनिटच्या पुढील बाजूला असलेला ८ मिमी इनपुट पोर्ट वापरतो. ती मात्र स्वतंत्रपणे खरेदी करावी लागते.

ब्लूटी ईबी 70: तांत्रिक तपशील तपशील खालीलप्रमाणे आहे.

  • वजन: ९.७ किलो
  • कमाल इनपुट पॉवर: २००W
  • सौर इनपुट: १२- २८V, २००W पर्यंत
  • ठराविक क्षमता: ७१६ Wh
  • आउटपुट पॉवर: ७००W
  • वायरलेस चार्जिंग: होय, १५W
  • यूएसबी-सी आउटपुट: १००WX २ (पीडी ३.०)
  • पीक पॉवर: १४००W
  • सेल केमिस्ट्री: LiFePO4, २५००+ पर्यंत चार्ज चक्र
  • डायमेन्शन : १२.६ x ८.५ x ८.७ इंच

गॅस फायर जनरेटरमध्ये साधारणत: वापरकर्ते ४- ६ तासांच्या आत बॅटरी चार्जिंग करण्यासाठी गॅस-फायर जनरेटरचा वापर करू शकतात. ब्लूट्टी ईबी ७० पॉवर स्टोरेजची वास्तविक किंमत ४९९ डॉलर म्हणजेच सुमारे ३७ हजार रुपये इतकी आहे, परंतु मर्यादित काळातील कूपन कोडचा वापर करून तीच वस्तू तुम्हाला सुमारे 30 हजार रुपये मध्ये खरेदी करता येईल.

- Advertisment -

Most Popular