25 C
Mumbai
Sunday, February 5, 2023

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeCoronavirusयेत्या 2-3 महिन्यांपर्यंत लसींचा तुटवडा जाणवणार - अदर पूनावाला

येत्या 2-3 महिन्यांपर्यंत लसींचा तुटवडा जाणवणार – अदर पूनावाला

देशामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेची गती वाढवीण्यासाठी भारतीय प्रशासन खूपच आग्रही दिसत आहे. किंबहुना वेगाने लसीकरण करण्यासाठी त्या दिशेने पावलंही उचलण्यात आली आहेत. असे चिन्ह असतानाच देशात मात्र आत्ता लसींच्या तुटवडया अभावी लसीकरण मोहीम आवरत्ती घ्यावी लागत आहे. देशामध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी परदेशी लसींचीही आयात करण्यात येत आहे. देशाच्या लोकसंख्येच्या दृष्टीनं मात्र हा पुरवठा अपूराच आहे, असे एकूण चित्र स्पष्ट होत आहे. याच दरम्यान, भारतामध्ये कोवीशिल्ड लस निर्मिती करण्याऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अदर पूनावाला यांनी देखील येत्या 2-3 महिन्यांपर्यंत लसींचा तुटवडा अशाच पद्धतीनं जाणवत राहिल असं सूचक वक्तव्य केलं आहे.

एका दिवसाला सध्याच्या घडीला 6-7 कोटी लसींची निर्मिती करण्याचा आकडा जुलै महिन्यात 10 कोटींवर पोहोचण्याची शकयता वर्तवली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये मागणी कमी असल्यामुळं कंपनीनं लसींच्या निर्मितीच प्रमाण वाढवलेलं नव्हतं. त्यामुळेच जुलै महिन्यापर्यंत तरी लसींचा तुटवडा हमखास जाणवण्याची चिन्हं आहेत.

लसीला एवढी मागणीही नव्हती आणि आम्ही विचारही एवढ्या लसींची निर्मिती एका वर्षाला इतक्या मोठ्या प्रमाणात करावी लागेल, याची कल्पना ही केली नव्हती. कोविडच्या दुसऱ्या लाटेचा कहर संबंधित यंत्रणेला जानेवारी महिन्यापासून अपेक्षित नव्हता. कोविडच्या संसर्गाला आपण थोपवू शकलो आहोत, असे सर्वांना वाटत होतं असे ते मुलाखतीत म्हणाले. 18+ नागरिकांसाठीच्या लसींच्या उत्पादनासाठीही शासनानं मागील महिन्यात सिरमला 3 हजार कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिलेली आहे. या लसीकरणासाठी विशेष करून ही तरतूद करण्यात आली असल्याची महत्त्वाची माहिती पुनावाला यांनी मुलाखती दरम्यान दिली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर भारतामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. देशाच्या रुग्णसंख्येत प्रत्येक दिवशी २-३ लाखांहून अधिक नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ होत आहे. ज्यामुळं त्याचा पूर्ण ताण देशातील आरोग्य यंत्रणा आणि वैद्यकिय सुविधांवर पडत आहे. कोरोनाचा हा वेगाने पसरणारा  संसर्ग नियंत्रित करण्यासाठी म्हणून देशात विविध टप्प्यांमध्ये वेगाने लसीकण मोहिम करण्याचे काम हाती घेतले आहे. ज्यामध्ये प्रथम ६०+ आणि आता 18-44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतांश भागांमध्ये लसीकरण मोहिमेस वेगाने सुरुवात केली गेली आहे. पण, मर्यादित असलेल्या लसींच्या साठ्यामुळे या मोहिमेला अनेक अडथळ्याचा सामना करावा लागत आहे, ही ओढवलेली परिस्थितीही नाकारता येत नाही.

सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना शिवसेनेतील काही गुंडांनी धमकावले, त्यामुळे अदर पुनावाला इथे न राहता परदेशात निघून गेले, असे वक्तव्य एका वृत्तवाहिनीचे सूत्रसंचालक यांनी केले होते. परंतु, त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध केला गेला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी यासंदर्भात त्या वृत्तपत्रसमूहाला पत्र पाठवून सूत्रसंचालकावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकावल्याचे म्हटले असून ही गोष्ट पूर्णता: खोटी असून यामागे केवळ शिवसेनेची बदनामी करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे संबंधित सूत्रसंचालकावर कारवाई करण्यात यावी, सुभाष देसाई यांनी पत्रामध्ये असे म्हटले आहे.

- Advertisment -

Most Popular