28 C
Mumbai
Wednesday, July 6, 2022

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....

मध्य रेल्वे मुंबई भरती २०२२

मध्य रेल्वे मुंबई येथे रिक्त पदांची भरती...
HomeIndia Newsकोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक

कोरोनाच्या दुसर्या लाटेबाबत चिंताजनक परिस्थिती सुरु असताना, तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक ठरणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतीत माहिती दिली आहे, राज्यामध्ये या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करण्यात येणार आहे. तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं कि, कोरोनाचा फैलाव लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या निदर्शनास येत असून, तिसऱ्या लाटेबाबत सूचित केलेली सूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येणार आहे.

राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असून, सर्व जनता धैर्याने त्याला सामोरी जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेची देखील पूर्वसूचना देण्यात आलेली आहे. संभवणारा धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने आधीच पावले उचलायला सुरुवात केली आहे. विशेष करून आधी वयोवृद्ध, त्यानंतर 18 ते 44 वयोगट आणि या लाटेमध्ये आता लहान मुलांमधील संकर्मणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्यांच्या त्वरित उपचारासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तातडीने उपलब्ध केला जाईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केले. टास्क फोर्स या माध्यमातून लहान मुलांची काळजी आणि योग्य उपाय योजना करण्यासाठी काम करेल.

third wave corona effect

तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे उद्भवलेल्या अनेक समस्या, रुग्णालयातील बेडची संख्या वाढविणे, लहान मुलांसाठीचे व्हेंटीलेटर्स, एनआयसीयु मधील बेडस् यांची पूर्ण तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. गुरूवारी रात्री मुख्यमंत्री महोदयांनी देखील दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विविध बालरोग तज्ञांशी संवाद साधलेला. देशात महाराष्ट्र लसीकरणात आघाडीवर आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी पुरेशी लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाला स्थगित करावे लागत आहे, त्यामुळे लसीकरण जेवढ्या वेगाने झाले पाहिजे तसा काही वेग अजून आलेला नाही. तसेच शरीरामध्ये इतर आजार अथवा व्याधी असलेल्या नागरिकांपैकी 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना प्रथम प्राधान्यक्रम देऊन लस देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर जागतिक निविदेच्या माध्यमातून खरेदी करण्याची तयारी सुरु आहे. तसेच या यंत्राच्या तांत्रिक बाबी तपासणीसाठी तीन डॉक्टरांची समितीही तयार करण्यात आली आहे. त्याच सोबत ३ लाख रेमडेसीवीर इंजेक्शन आयातीसाठी डीसीजीआयच्या मान्यतेने खरेदीसाठी डीडी वितरीत करण्यात आले आहेत.

- Advertisment -

Most Popular