25 C
Mumbai
Sunday, February 16, 2025

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeSports Newsआयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी संघ जाहीर

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी संघ जाहीर

बीसीसीआयनं ट्वीट करून भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं जून महिन्यात खेळल्या जाणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यासाठी आणि इंग्लंडविरोधातील पाच सामन्यांच्या टेस्ट सीरिजसाठी संघाची घोषणा केली आहे याबाबत माहिती दिली आहे.

भारतीय टीममध्ये हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि पृथ्वी शॉ यांचा समावेश करण्यात आलेला नाही. विजय हजारे ट्रॉफी आणि आयपीएलमध्ये पृथ्वी शॉनं उल्लेखनीय कामगिरी केली होती. संघामध्ये निवडकर्त्यांनी चार सलामीवीर फलंदाजांना स्थान दिलं आहे. यामध्ये केएल राहुल, रोहित शर्मा, मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल यांचा समावेश आहे. केएल राहुलची नुकतीच अपेंडिक्स सर्जरी झाली असून, दौऱ्याआधी जर तो तंदुरुस्त झाला तर त्याचा संघामध्ये समावेश करण्यात येईल.

मधल्या फळीमध्ये कर्णधार विराट कोहली, उप-कर्णधार अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, आणि हनुमा विहारी यांना स्थान देण्यात आले आहे. तर विकेटकिपर म्हणून ऋषभ पंतला पसंतीस उतरला आहे. के राहुल सारखे वृद्धिमान साहाला सुद्धा फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. मागील मंगळवारी साहा कोरोना संक्रमित झाला होता. आणि जर दौऱ्याआधी फिट असेल तरच त्याला संघात स्थान मिळू शकते. स्पिन गोलंदाजीची कमान रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्याकडे दिलेली आहे.

वेगवान गोलंदाजी करणारे तगडे खेळाडू जसे कि, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी,  मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांचा संघात स्थान दिलेला आहे, त्या सोबतच स्टॅंडबाय म्हणून अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, अर्जन नागवासवाला आणि आवेश खान या चार खेळाडूंना  स्थान देण्यात आले आहे.

ICC World Test Championship team announced

18 जून ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल साठी सज्ज झालेला संघ पाहूया. भारतीय संघामध्ये : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अंग्रवाल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, शर्दुल ठाकुर, उमेश यादव यांचा समावेश आहे. त्यातील केएल राहुल आणि विकेटकीपर साहा यांना फिटनेसची टेस्ट पास झाल्यावर संघात स्थान मिळू शकेल. तर स्टँडबाय खेळाडू म्हणून अभिमन्यु ईस्वरवान, प्रसिध्द कृष्णा, अवेश खान, अर्जन नागवासवाला यांचा समावेश केला आहे.

test cricket india

भारतीय टीम न्यूझीलंड विरोधात 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळवली जाणार आहे. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात इंग्लंड विरोधात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टीम इंडियाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आयसीसी विश्व टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.

- Advertisment -

Most Popular