येवला आणि सुंदर नक्षीकाम केलेली पैठणी यांचे विशेष जवळचे नाते आहे. महाराष्ट्राची शान असलेली पैठणीला साड्यांची महाराणी असे संबोधले जाते. भारतामध्ये सणासुदीच्या काळामध्ये पैठणी सारख्या साडीला खूप मागणी आहे. प्रत्येक स्त्रीचे स्वप्न आहे कि आपल्याकडे एकतरी पैठणी असावी. पूर्वापार चालू असलेल्या पैठणीच्या रुपामध्ये नवीन बदल करण्यात आला आहे. पूर्वी पैठणीवर जरतारीचा नाचरा मोर असायचा. पण यावेळी पैठणी मध्ये मोराबरोबर पोपट, सिंह आणि कोल्हा यांचे सुद्धा विणकाम दिसणार आहे. एक पैठणी विणून तयार करायला साधारण ६ ते ७ महिन्यांचा कालावधी लागतो. त्याचप्रमाणे पैठणीच्या किमतीमध्येही खूप उतार चढाव दिसून येतात. अगदी हजारांपासून ते ६ लाखांपर्यंतच्या पैठणीच्या किमती असतात. हंड्लूम प्रकारचे कापड आणि त्यामध्येच आत्ता विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी विणण्यात येणार असल्याने , या पारंपारिक कलेमध्ये केलेल्या बदलाला महिला वर्गाकडून किती प्रतिसाद मिळतो ते लवकरच लक्षात येईल.
सध्या कोरोनाच्या काळात दुकाने बंद असल्याने पैठणीला मोठ्या प्रमाणात ऑनलाईन मागणी आहे. व्यापार्याना ऑनलाईन पैठणीची विक्री हा एक पर्याय असल्याने एक आशेचा किरण समोर आला आहे. व्यापार्यांनी घरपोच डीलीवरी ची तसेच ऑनलाईन पेमेंटची सुविधा ठेवल्याने ग्राहकांसाठी हि गोष्ट अतिशय उपयुक्त ठरली आहे. जगभरातून साऱ्या मागणीमुळे ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून पैठणीची खरेदी-विक्रीत मोठ्या वाढ झाल्याचे दिसते आहे.
जगभरात प्रसिद्ध असलेल्या येवल्यातील पैठणीच्या खरेदीसाठी ग्राहकांची कायम गर्दी असते. मात्र, कोरोनाचे सावट आणि देशभर सुरु असलेले लॉकडाऊन त्यामुळे पैठणीचा व्यवसाय संथगतीने सुरु आहे. सुट्ट्यांमध्ये अथवा सणांना मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातील ग्राहकांची पैठणी खरेदीसाठी येवल्यात फेरी असतेच. मात्र, सध्या सर्व मंदिरे, त्याचप्रमाणे पर्यटन स्थळांवर बंदी असल्याने येवल्यातील पैठणीच्या दुकांनांमध्ये शांतता पहायला मिळत आहे. राज्यात विशेष नियमांसकट लॉकडाऊन कमी केला जात आहे. परंतु, कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे लोकं घराबाहेर पडायला तयार नाहीत. याचा परिणाम कापडाच्या व्यापार व्यवसायावर विशेष होताना दिसत आहे. कारण कोणतेही कपडे खरेदी करताना ग्राहक खूप चोखंदळपने निवडून खरेदी करतो. त्यामुळे नियमांमध्ये शिथीलता देऊनही कापडाच्या व्यवसायांना उभारी मिळणे कठीण झाले आहे. अशामध्येच ऑनलाईन खरेदी, विक्रीमुळे व्यवसायांना आधार मिळत आहे. मात्र, प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करण्याचा आनंदचं वेगळा. परंतु ऑनलाईन खरेदी विक्रीमुळे ग्राहकांना घरबसल्या काहीही खरेदी करता येते, व व्यापारी वर्गाला सुद्धा ऑनलाईन चालना मिळते.