25 C
Mumbai
Sunday, February 16, 2025

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeLifestyleरोगप्रतिकारशक्ती वाढविणारे धणे आणि लसूण

रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे धणे आणि लसूण

भारतीय खाद्यपदार्थांमध्ये मसाल्यामध्ये धणे पावडर विशेषकरून वापरली जाते. बहुतेक सर्व घरांमध्ये हा एक कायम उपलब्ध असलेला सामान्य मसाला आहे. धणे खाल्ल्याने आरोग्याला होणारे अनेक फायदे ऐकून अवाक व्हायला होईल. धण्याचे पाणी जर उपाशी पोटी सेवन केले तर ते अधिकचं फायदेशीर ठरते आहे. धण्याचे पाणी अनुशापोटी पिण्याने नेमके आरोग्याला कोणकोणते लाभ होतात आणि हे पाणी कसे तयार करायचे हे आज आपण पाहणार आहोत.

हे पाणी तयार करण्यासाठी रात्री 1 कप पाण्यात 1 चमचे धणे भिजत घाला. सकाळी हे पाणी चाळून घेऊन, ते प्यावे तसेच धणे सुद्धा चघळून खाल्ले तरी त्याचे फायदे चांगलेच आहेत. पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. धणे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करतात. त्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडेंट्स घटक शरीरातील मुक्त रॅडिकल्स कमी करण्यास सहाय्य करतात. हे शरीराला कोणतेही संसर्ग होण्यास किंवा इतर आजार होण्यापासून प्रतिबंधित करतात. तसेच पचन व्यवस्थेसंबंधित अनेक आजार असे धणे पाणी पिण्याने बरे होतात. सकाळी या पाण्याचे सेवन केल्याने पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे चयापचय क्षमता वाढून अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होते. धण्यामध्ये मोठ्या प्रमाणात  सी आणि ए जीवनसत्त्वे आढळतात, त्यामुळे केस मजबूत राहण्यास आणि त्यांची निरोगीपणे वाढ होण्यास मदत होते. धणेतेलाचा वापर देखील केसांचा पोत चांगला राखण्यासाठी करू शकतो.

धण्यामध्ये अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. धणे पाण्याचे सेवन केल्याने चेहर्याला एक चमकदारपणा येतो. तसेच त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास मदत होते. सकाळी धणे पाणी पिण्याने आपण दिवसभर उत्साही राहतो. हे आपल्या शरीरावर डिटॉक्स करते. मधुमेह आजार असलेल्या माणसांनी सकाळी धणे पाणी पिण्यापूर्वी निश्चितचं डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करावे, कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते.

Garlic as a immunity booster

सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाने शरीराची ताकद आणि रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी धण्याच्या पाण्यासोबत एक दिवस आड दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास लसूण पाणी सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. ते पाणी बनविण्याची सुद्धा एक पद्धत आहे. यासाठी सहा ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक ग्लास पाणी घेऊन, सुरूवातीला पाणी मंद आचेवर उकळत ठेवा त्यानंतर त्यामध्ये लसूण घ्याला. काही वेळ हे पाणी उकळल्यावर मग ते प्यावे. लसणाच्या सेवनामुळे शरीरात नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण वाढते. ज्या लोकांना उच्च रक्तदाब समस्या आहे. त्यांच्यासाठी खूप लसूण खूप फायदेशीर आहे. रोगाच्या दरम्यान, स्मरणशक्ती कमी होऊ लागते. हा रोग बहुतेक वेळेस म्हातारपणात होतो. लसूणमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. हा रोग रोखण्यास ते मदत करतात. म्हणून, लसणाच्या सेवनाने हा रोग रोखू शकतो. लसूणमध्ये अँटी-कर्करोग घटक असतात. ते कर्करोगापासून संरक्षण करण्यात मदत करतात.

- Advertisment -

Most Popular