HomeSports NewsFootballहैदराबाद विरुद्ध ईस्ट बंगाल लढत

हैदराबाद विरुद्ध ईस्ट बंगाल लढत

फुटबॉल इंडियन सुपर लीग स्पर्धेच्या सातव्या मोसमातील प्ले-ऑफ फेरीसाठी हैदराबाद एफसी व ईस्ट बंगाल यांच्यासाठी शुक्रवारी होणार असलेला सामना अतिशय महत्त्वाचा आहे. विशेषतः हैदराबादच्या संघासाठी पूर्ण तीन गुण महत्त्वाचे असतील. वास्को येथील टिळक मैदानावर ईस्ट बंगाल व हैदराबाद यांच्यातील सामना खेळला जाईल. मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शना खाली हैदराबादचे सध्या २३ गुण असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत. नॉर्थईस्ट युनायटेड विरुद्ध एफसी गोवा यांचेही तेवढेच गुण असून ते अनुक्रमे पाचव्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. हैदराबादने ईस्ट बंगालला हरविल्यास ते तीन गुणांच्या आघाडीसह तिसऱ्या क्रमांकावर येतील. सध्या हा संघ ८ सामने अपराजित असून या कालावधीत तीन विजय व पाच बरोबरी अशी त्यांची कामगिरी आहे.

सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी वास्को येथील टिळक मैदानावर एससी ईस्ट बंगालची हैदराबाद एफसीविरुद्ध लढत होईल. ईस्ट बंगालचे हिरो आयएसएलमधील पदार्पण अडखळत झाले. बहुतांश मोसमात त्यांना शेवटी राहावे लागले. यानंतरही त्यांच्या सर्व आशा संपुष्टात आल्या नाहीत. चौथ्या क्रमांकावर असलेल्या हैदराबादला नमवीले तर ते प्रतिस्पर्ध्या विरुद्धची पिछाडी चार गुणांपर्यंत कमी होऊ शकतील. त्यांचे तीन सामने बाकी असतील. त्यादृष्टीने या लढतीसह पुढील ४ सामने त्यांच्यासाठी अंतिम फेरी इतकेचं महत्त्वाचे आहेत. ईस्ट बंगालने १६ सामन्यांतून १६ गुण मिळविले आहेत. एफसी गोवा, नॉर्थईस्ट युनायटेड आणि हैदराबाद या तीन संघांच्या संधीला धक्का बसावा म्हणून त्यांना इतर संघांवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे. या सर्व तिन संघांची १६ सामन्यांतून २३ गुण अशी समान कामगिरी आहे. ईस्ट बंगालसाठी मोहिम संपलेली नाही. एटीके मोहन बागान, नॉर्थईस्ट आणि शेवटचा ओदीशा हे त्यानंतरचे तीन प्रतिस्पर्धी आहेत.

सहाय्यक प्रशिक्षक टोनी ग्रँट यांच्यासाठी शुक्रवारची लढत सर्वांत कसोटीची असेल. त्यांनी सांगितले की, इतर बहुतांश क्लबपेक्षा मी हैदराबादला वरचे स्थान देतो. गेल्या दोन मोसमांच्या तुलनेत त्यांचा संघ सरस आहे. त्यांच्याकडे काही चांगले खेळाडू आहेत. हा सामना खडतर असेल. ते आमच्यापेक्षा काही गुणांनी पुढे आहेत. त्यामुळे त्यांना प्रयत्न करून स्वतः:चे स्थान राखून ठेवण्यासाठी नक्कीच अधिक वाव आहे. या सामन्यातून काही कमाई करायची असेल तर ईस्ट बंगालला आक्रमणाच्या निर्णायक टप्प्यात सर्वोत्तम खेळ करून दाखवावा लागेल. मैदानी खेळातून सर्वांत कमी सात गोल त्यांचे आहेत. त्यांचा तारणहार ठरलेल्या ब्राईट एनोबाखरे याची कामगिरी चमकदार प्रारंभानंतर ढासळली आहे. सामन्याचा निकाल दुसऱ्या सत्रात लागण्याची जास्त शक्यता आहे.

- Advertisment -

Most Popular