28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeInternational Newsदक्षिण आफ्रिका परत करणार सिरमचे १० लक्ष डोस

दक्षिण आफ्रिका परत करणार सिरमचे १० लक्ष डोस

कोरोना अजून संपुष्टात आलेला नाही. अजूनही जगभरात कोरोन संसर्गाचे प्रमाण कमी जास्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला १६ जानेवारी रोजी सुरुवात झाली. भारतातील सिरम इंस्टीट्युट ऑफ इंडिया या कंपनी मार्फत जगभरातील काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ठराविक प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. कोरोनाचे नवीन निर्माण झालेले जागतिक आरोग्य संघटनेने एस्ट्राजेनेकाच्या कोविशील्ड कोविड लसीला जगभरामध्ये आपत्कालीन वापरासाठी परवानगी मंजूर केली आहे. पुण्यातील सिरम इंस्टीट्युट हे जगभरात पाठविल्या जाणाऱ्या कोविड लसीमुळे प्रसिद्धीला आली. सिरम इंस्टीट्युट ऑफ इंडिया ही कंपनी ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेका ही कोरोना संरक्षक लस बनवत असून जगभरात त्याला मोठ्या प्रमाणात मागणीही आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या नव्या व्हेरीएंटमुळे ही लस त्यावर फायदेशीर ठरेल अथवा नाही यावर सध्या संदिग्ध मनस्थिती निर्माण झाली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य मंत्रालयाने एस्ट्राजेनेका लस ही तेथील कोरोना व्हेरिएंटवर प्रभावी ठरत नसल्या कारणाने सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीयाला आपली लस मागे घेण्यास सांगितले आहे. याआधी कोरोन लसीकरणात आम्ही एस्ट्राजेनेकच्या लसीचा वापर करणार नाही असे दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले होते. मागीलच आठवड्यामध्ये दक्षिण आफ्रीकेने केलेल्या मागणी नुसार कोरोना लसीच्या १० लक्ष डोसांचा एक टप्पा तिथे पोहच करून पूर्ण करण्यात आला व उर्वरित ५ लक्ष दोसांचा दुसरा टप्पा पुढील काही आठवड्या मध्येच तिथे पोहोचणार होती. परंतु आत्ता दक्षिण आफ्रिकेने नवीन निर्माण झालेल्या व्हेरीएटवर ही लस कमी कार्य्शाली असल्याचे स्पष्ट केले आहे आणि एस्ट्राजेनेकच्या लसीचा वापर करण्यास तूर्तास स्थगिती दिली आहे. हा व्हेरीएंट सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेतच निदर्शनास आला. परंतु, दक्षिण आफ्रिकेचे आरोग्यमंत्री ज्वेली मिखाइज यांच्यासह अनेक देशातील शास्त्रज्ञांनी कोरोन लसीचे परीक्षण केले , परंतु एस्ट्राजेनेकच्या लसीबाबत शंका व्यक्त करण्यात आली. ही लस एका विशेष व्हेरीएंट बाबत करी कार्यशाली असल्याचे समोर आले.

८ फेब्रुवारीला खर तर दक्षिण आफ्रिकेत लसीकरणाला सुरुवात होणार होती, परंतु, ते लसीकरण अभियान रोखण्यात आले. अद्याप लसीकरणाला सुरुवात केली गेली नाही आहे. तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना तूर्तास जॉन्सन अॅण्ड जॉन्सनची कोरोना संरक्षक लस देण्याचा निर्णय तेथील शासनाने घेतला आहे. परंतु, नवीन स्ट्रेनवर जॉन्सन अॅण्ड जॉन्सन आणि नोवक्स लस परिणामकारक नाही असे सांगितले. परंतु, या संदर्भात सीरम इन्स्टिट्यूटने काहीही माहिती देण्यास नकार दिला आहे. मोडर्ना नव्या स्ट्रेनसाठी परिणामकारक बुस्टर शॉट तयार करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीयाची कोरोना संरक्षक लसीचे १० लक्ष डोस कमी परिणामकारक असल्याने दक्षिण आफ्रिकेला ते परत करायचे आहेत.

कोरोना महामारीच्या काळापेक्षा सद्य स्थितीत संसर्गाचे प्रमाण नक्कीच खूप प्रमाणात कमी झालेले निदर्शनास आले. परंतु पूर्णता: अजून व्हायरस नष्ट झालेला नाही. नवनवीन निर्माण होणारे स्ट्रेन खूपच घातक आणि पहिल्यापेक्षा संक्रमक आहेत. वेगाने त्याचा संसर्ग वाढत चालला आहे. सर्वात प्रथम नव्या स्ट्रेन चा उदय दक्षिण आफ्रीके मध्येच झाला. नवीन स्ट्रेनच्या प्रसारणामध्ये दक्षिण आफ्रिका, ब्रिटन मधील केंट आणि ब्राझीलच्या व्हेरिएंटचा समावेश आहे.

- Advertisment -

Most Popular