27 C
Mumbai
Wednesday, September 11, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...
HomeInternational Newsटूलकीट प्रकरण नवे वळण

टूलकीट प्रकरण नवे वळण

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या तीन नवीन कृषी कायद्या विरोधात मागील ७५ दिवसांपासून नवी दिल्लीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणत आंदोलन सुरु आहे. यामध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. समाजातील काही स्तरांमधून समर्थन केले जात आहे. शांतपणे सुरु असलेल्या या आंदोलनात आंतरराष्ट्रीय पर्यावरण प्रेमी ग्रेटा थुलबर्ग यांनी ट्विटरवर शेतकरी आंदोलना समर्थनात एक टूल किट शेअर केले होते. यामध्ये आंदोलनाला समर्थन देऊन ते कशा प्रकारे यशस्वी करता येईल, त्यात वाढ कशी करता येईल त्यावर विविध प्रकारे रुपरेषा देण्यात आली आहे. यामध्ये ट्विटरवर मोठ्या प्रमाणात चळवळ सुरु झाली, भारतीय दूतावासाबाहेर आंदोलन करणे, अधिक समर्थन मिळवणे इत्यादी बाबींचा सहभाग असतो.

पॉप सिंगर रिहानाच्या ट्वीटनंतर पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनेही शेतकरी आंदोलनाला पाठींबा दर्शवून, त्याविषयी ट्वीट केले होते. ग्रेटा यांनी ट्विट केले होते की, भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकां सोबत आम्ही एकतेने उभे आहोत. त्यांच्या मदतीसाठी एक टूलकिट शेअर करत आहे. ज्याचा फायदा नक्कीच शेतकर्यांना होईल.

पण नक्की टूलकीट हे काय प्रकरण आहे ते पाहूया, टूलकिट हे एक डिजिटल माध्यम आहे, ज्याच्या वापराने कोणत्याही आंदोलनात वाढ कशी करता येईल याबाबत माहिती देण्यात येते. या माध्यमाद्वारे आंदोलनात मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला जातो. टूलकिटच्या मदतीद्वारे आंदोलन कसे करावे, त्याला टप्प्याटप्प्याने कसे विस्तारित रूप द्यावे याची संपूर्ण माहिती देण्यात येते. आंदोलना संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना कोणती खबरदारी घ्यावी,कोणती नियमावली असते, पोलीस कारवाई झाली तर त्यावेळी काय कराव हे सुचत नाही, अशा प्रसंगाला कसे तोंड द्यावे याची माहिती या टूलकिटच्या माध्यमाद्वारे देण्यात येते. तसेच आंदोलन करताना कोणत्या अडचणीला सामोरे जावे लागले तर कोणाशी संपर्क साधावा याची माहिती या टूलकिटच्या माध्यमातून  देण्यात आली आहे.

या प्रकरणात अनेक नावे हळू हळू समोर येत आहेत. निकीता जेकब हिच्या नावाची सुद्धा चर्चा सर्वत्र होत असल्याचे पाहून निकीता जेकब यांनी मुंबई हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे. मी सर्वधर्म समान मानते आणि सामाजिक शांतते वर माझा विश्वास आहे. मला विनाकारण यात अडकवले जात असून सोशल मीडियावर माझ्यावर टीका केली जात आहे, असा दावा तिने या याचिकेत केला आहे. शनिवारी पुन्हा एकदा पोलिसांनी याच प्रकरणी दिशा रवी या बंगळूरमधील एका २२ वर्षीय तरुणीला अटक केली आहे. त्याचप्रमाणे दिल्ली पोलिसांनी शंतनू नावाच्या व्यक्ती विरोधातही अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे.

दिशा रवी ही बेंगळुरु मधील माउंट कार्मेल महाविद्यालयाची विद्यार्थीनी असून ती पर्यावरण संदर्भात चळवळीत सक्रिय असते. पोएटिक जस्टीस फाउंडेशन नावाच्या संस्थेच्या मदतीने दिशा रवी देशामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्नांत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. दिशा रवी ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ या मोहीमेची सह-संस्थापक आहे. याच फ्रायडे फॉर फ्यूचर या मोहीमेअंतर्गत पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटाही चर्चेत आली होती. या मोहीमेच्या माध्यमातून जगभरातील पर्यावरण संरक्षणाच्या प्रश्नावर आवाज उठवला जातो.

तिच्या प्रमाणे कॅनडातील व्हँकूव्हरमध्ये राहणारी अनिता लाल ही धालीवालची सहकारी आहे. व्यवसाया पासून ते खालिस्तानी अजेंडा संदर्भातील प्रत्येक गोष्टीत तीचा सक्रीय सहभाग असल्याचे समोर आले आहे. अनिता लाल या खलिस्तानी समर्थक पोएटीक जस्टिस सोसायटीची सह-संस्थापक आहेत. तसेच ती या संस्थेचे कार्यकारी संचालक देखील आहे. अनिता लाल खलिस्तान समर्थक धालीवाल याची मुख्य सल्लागार असल्याचंही बोलले जात आहे आहे. अनिता लालच्या ट्विटर अकाऊंटवरून हेच निदर्शनास येते कि, ती शेतकरी आंदोलन आणि भारता विरूद्ध सुरु असलेले आंदोलनाचे हॅशटॅग सतत वापरून ट्वीट पोस्ट करत होती. त्यामुळे बाहेरील देशातील विविध लोकांचा आंदोलनामध्ये हस्तक्षेप वाढल्याने आंदोलनासकट टूलकीट प्रकरणाला वेगळेच वळण लागल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -

Most Popular