27 C
Mumbai
Monday, August 8, 2022

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....

मध्य रेल्वे मुंबई भरती २०२२

मध्य रेल्वे मुंबई येथे रिक्त पदांची भरती...
HomeInternational Newsजगातील देशांचा हॅपीनेस स्कोअर

जगातील देशांचा हॅपीनेस स्कोअर

सलग चौथ्या वर्षी फिनलॅण्डने जागतिक आनंद निर्देशांकीत देशामध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास संस्थेने जाहीर केलेल्या जागतिक आनंद निर्देशांक अहवालानुसार  त्यात 149 देशांचा सहभाग असून त्यामध्ये भारत 139 व्या स्थानावर आहे.

सलग चौथ्या वर्षी फिनलॅण्डने जागतिक आनंद निर्देशांकीत देशामध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास संस्थेने जाहीर केलेल्या जागतिक आनंद निर्देशांक अहवालानुसार  त्यात 149 देशांचा सहभाग असून त्यामध्ये भारत 139 व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीशी तुलना करता, भारताची स्थितीन्ध्ये किंचित सुधारणा झाली आहे. परंतु, शेजारील देशांनी या यादीमध्ये भारताला पिछाडीवर टाकले आहे. युरोपातील नऊ देश पहिल्या 10मध्ये आघाडी घेऊन आहेत. फिनलॅण्डच्या नंतर  डेन्मार्क, आइसलॅण्ड, नेदरलॅण्ड्स, नॉर्वे, स्वीडन, स्वित्झर्लंड, लक्झेमबर्ग व ऑस्ट्रिया हे देश समाविष्ट आहेत. जगातील आनंदी देशांची ही यादी व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचारपातळी, एकूण देशांतर्गत मिळणारे उत्पन्न, तसेच सामाजिक पाठबळ या निकषांवर दरवर्षी ठरविली जाते.

यंदाच्या वर्षी कोविड-19 महामारीच्या मोठ्या आव्हानातमक काळामध्ये हा अहवाल कसा तयार करावा, हे एक प्रकारचे आव्हानचं होते. कारण जगातील सर्वच देशांना कोरोना संसर्गाने वेठीस धरले आहे. या अहवालाच्या सादर कर्त्यांपैकी एक जेफ्री सॅक यांनी सांगितले कि, जागतिक पर्यावरणाच्या धोक्यांची जाणीव कोरोना महामारीमुळे आपल्याला कळाली आहे. या अहवालात निव्वळ असणार्या संपत्तीपेक्षा लोकांच्या सुख-समाधानाचा वेग आणि वेध दी वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट-2021 मध्ये घेतलेला दिसेल. शाश्वत विकासाची आव्हाने आपण स्वीकारली नाहीत, तर वाईट स्थितीला आपल्याला तोंड द्यावे लागू शकते, अशा प्रकारचा एक संदेशचं यातून देण्यात आला आहे. पुढे या अहवालाच्या लेखक म्हणतात की, कुठल्याही देशाच्या आनंद निर्देशांकात महत्त्वाचे मोजमाप हे विश्वासचं असते. ज्या देशामध्ये नागरिकांनी तेथील सर्व संस्थांवर श्रद्धा व विश्वास दाखवला व ज्या देशामध्ये उत्पन्नची असमानता दिसली नाही, त्या देशांनी एकत्र मिळून कोरोना साथीला चांगल्या पद्धतीने सडेतोड उत्तर दिले.

Happiness scores of countries around the world

गेल्या वर्षीपासून पिछाडलेल्या कोरोना महामारीच्या काळात जवळजवळ सर्वच देश हतबल झालेले दिसत आहेत. गेले पूर्ण वर्ष अनेक देश या संकटांचा अनेक प्रकारे सामना करीत आहेत. युनायटेड नेशन्सच्या एका अहवालात असे म्हटले गेले आहे की, यंदा कोरोनाचा संसर्ग सर्वत्र असून सातत्याने चौथ्या वर्षीही फिनलँड हा जगातील सर्वात सुखी असणारा देश ठरला आहे. एका स्थानिक वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, संशोधक म्हणाले की लोकांचा विश्वास जिंकण्यात फिनलँड कायमच अव्वल ठरला आहे. या महाभयंकर कोरोना विषाणूच्या साथीच्या रोगा दरम्यान लोकांचे जीवनमान विस्कळीत न होऊ देता योग्य तर्हेने रुळावर आणण्यासाठी देशाचा मोठा हातभार लागला आहे.

जगातील देशांचा हॅपीनेस स्कोअर काढण्यासाठी या सर्वेक्षणात 149 देशांनी सहभाग नोंदवला असून देशाचे वैयक्तिक स्वातंत्र्य, सामाजिक सुरक्षा आणि भ्रष्टाचाराच्या निकषांवर लोकांच्या प्रश्नवर विचार केला गेला. या सर्व्हेक्षनामध्ये मागील तीन वर्षांचा सरासरी डेटा ग्राह्य धरला जातो. साधारणत: हा अहवाल गेल्या 9 वर्षांपासून प्रसिद्ध केला जात आहे. या यादीमध्ये पुन्हा सर्व युरोपियन देशांचे वर्चस्व दिसले आहे आणि फिनलँडनंतर डेन्मार्क दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्यानंतर स्वित्झर्लंड, आइसलँड आणि नेदरलँड्स आहेत. न्यूझीलंड यावेळी 9 व्या स्थानावर आहे. टॉप टेनमध्ये हा एकमेव युरोपियन देश आहे. जर्मनीच्या क्रमवारीमध्ये काहीशा प्रमाणात सुधारणा झाली असून 17 व्या स्थानावरुन 13 व्या स्थानावर उडी मारली आहे. तर फ्रान्सची वर्णी 21 व्या स्थानी लागली आहे. ब्रिटन 13 व्या स्थानावरून घसरून 17 व्या स्थानी आला आहे, अमेरिका 19 व्या क्रमांकावर स्थानापन्न झालेली आहे. भारताचा मात्र यादीमध्ये क्रमांक 139 व्या स्थानावर आहे.

जगातील सर्वात आनंदी Top 20 देशांची यादी खालीलप्रमाणे दिली गेली आहे.फिनलँड, डेमार्क, स्वित्झर्लंड, आईसलँड, नेदरलँड्स, नॉर्वे, स्वीडन, लक्झेंबर्ग, न्यूझीलंड, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, इस्त्राईल, जर्मनी, कॅनडा, आयर्लंड, कोस्टा रिका, युनायटेड किंगडम, झेक प्रजासत्ताक, युनायटेड स्टेट्स, बेल्जियम.

- Advertisment -

Most Popular