31 C
Mumbai
Friday, April 19, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeMaharashtra Newsराज्यात कोरोना बाधितांसह मृत्यूदरातही वाढ

राज्यात कोरोना बाधितांसह मृत्यूदरातही वाढ

सर्वाधिक कोरोना संसर्गित असणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचाही समावेश झाला आहे. कोरोना आटोक्यात राहावा, त्याचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यात विविध कठोर निर्बंधही लागू करण्यात आले आहेत.

कोरोनाचे सध्या राज्यात प्रमाण पुन्हा वाढलं आहे. राज्यात विविध प्रकारचे कठोर निर्बंध वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे लागू करण्यात आले आहेत. अशातच कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत कोरोना बाधितांच्या संख्येसह देशभरामध्ये मृत्यूदरातही वाढ झाल्याचं निष्पन्न झाले आहे. गेल्या चार आठवड्यांमध्ये मृत्यूदरात सरासरी 4.5 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रात या केंद्रीची 30 पथकं येऊन महाराष्ट्राची पाहणी करणार आहेत.

सोमवारी देशात नव्या कोरोना संक्रमीतांच्या संख्येत विक्रमी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. देशात एक लाखांहून अधिक नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली असून देशातील कोरोना बाधितांच्या आकड्यासोबतच मृत्यूदरातही विक्रमी वाढ झाल्याचं दिसत आहे. आतापर्यंत देशात कोरोना बाधितांची आकडेवरी वाढली तरी, कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक होती. अशातच आशादायी गोष्ट म्हणजे मृत्यूदर कमी होता. परंतु, आरोग्य मंत्रालयाने समोर आणलेल्या आकडेवारीमधून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, लसीकरण सुरु असूनही  देशातील मृत्यूदरात वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांत नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येच्या दराप्रमाणे मृत्यूदरातही समान प्रमाणात वाढ झालेली दिसते आहे. गेल्या चार आठवड्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. 8 मार्च २१ रोजी देशात कोरोनामुळे 96 जण मृत्यू पावले होते. तर 4 एप्रिलला कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 425 इतका आहे. याचा अर्थ गेल्या चार आठवड्यामध्ये मृत्यूदरातही सरासरी 4.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोना बाधितांची संख्या आधीच्या चार आठवड्यांत 50 टक्क्यांनी वाढत होती. मात्र मृत्यूदरात कोणतीही वाढ झाली दिसून आली नव्हती. याचाच अर्थ ज्या वेगाने कोरोना ग्रस्तांची संख्या वाढते आहे,  त्याच वेगाने देशात मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही वाढल्याने साऱ्यांची चिंता वाढली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या संख्येनुसार, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता एक कोटी 25 लाख 89 हजार 67 इथपर्यंत झाली आहे. तसेच देशामध्ये सक्रीय रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत जात असून ती संख्या आता ७ लाख 41 हजार 830 पर्यंत पोहोचली आहे. रविवारी मिळालेल्या आकडेवारीनुसर 52,847 रुग्णसंख्या कोरोनातून बरे झाले आहेत. तर एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता एक कोटी 16 लाख 82 हजार 136 इतकी नोंदवली गेली आहे.

सर्वाधिक कोरोना संसर्गित असणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचाही समावेश झाला आहे. कोरोना आटोक्यात राहावा, त्याचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यात विविध कठोर निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 30 लाख 57 हजार 885 कोरोना संक्रमितांची  नोंद करण्यात आली आहे. तर एकूण 56 हजार 33 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. यावेळी राज्यात 4 लाख 51 हजार 375 रुग्ण सक्रीय म्हणून नोंद केलेली आहे. रविवारी राज्यात एका दिवसांमध्ये 57 हजार 74 रुग्णांची नोंद करण्यात आलेली. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे. तर 222 रुग्णांचा कोरोना महामारीमुळे मृत्यू झाला होता. देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरामध्ये कोरोनाने पुन्हा एकदा विळखा घातला आहे.

- Advertisment -

Most Popular