27 C
Mumbai
Thursday, September 12, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...
HomeMaharashtra Newsलता भगवान करे; एक संघर्षगाथा

लता भगवान करे; एक संघर्षगाथा

पतीच्या आजारपणावरील औषधोपचारासाठी पायात शूज अथवा चप्पल न घालता अनवाणी धावून मॅरेथॉन जिंकणा-या लता करे यांच्या संघर्षमय आयुष्याची ही कहाणी या सिनेमाच्या आधारे मांडण्यात आली आहे.

बारामतीच्या ६६ वर्षीय लता करे यांच्यावर आधारित ‘लता भगवान करे; एक संघर्षगाथा’ या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. एखादी महिला अत्यंत गरीब परिस्थितीत आपल्या संसाराचा गाडा चालवण्यासाठी अपार कष्ट करत असते मात्र याच संघर्षामुळे रातोरात ती स्टार बनते, ऐकायला एखाद्या चित्रपटासारखी वाटणारी ही कथा आहे पुण्याच्या बारामती तालुक्यात राहणाऱ्या लता कारे यांची. पतीच्या आजारपणावरील औषधोपचारासाठी पायात शूज अथवा चप्पल न घालता अनवाणी धावून मॅरेथॉन जिंकणा-या लता करे यांच्या संघर्षमय आयुष्याची ही कहाणी या सिनेमाच्या आधारे मांडण्यात आली आहे. त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रियाही खूप भावनाविवश करणारी आहे. एका अतिशय गरीब सामान्य कुटुंबात कष्ट करुन रोजचा उदरनिर्वाह होण्यासाठी प्रपंच करणा-या माझ्यासारख्या एका महिलेला एवढा राष्ट्रीय मानसन्मान मिळेल, माझ्यावर एक चित्रपट चित्रित केला जाईल आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळणे,  याची मी कधी कल्पनाही केली नव्हती, असं त्यांनी म्हटलं आहे. एका स्वप्नाप्रमाणं माझ्यासाठी हे सगळं असल्याचं त्यांनी सांगितले. लता करे या मूळच्या बुलडाण्याच्या असून,  बारामतीमध्येच त्यांचा अख्खा जीवनप्रवास सुरू झाला.

lata bhagwan kare

एका मॅरेथॉनची जाहिरात वाचनात आल्यावर त्यातील बक्षीस मिळविण्याच्या रकमेने आपण आपल्या आजारी पतीवर उपचार करु शकू, असे लता यांना वाटले. मॅरेथॉन म्हटल्यावर डोळ्यासमोर दिसते ते ट्रेक सूट , शूज, आणि बरेच काही. परंतु, गरजेला एखादी स्त्री कोणत्याही संकटाला कोणत्याही परिस्थितीत सामोरी जाऊ शकते याचे जिते उदाहरण म्हणजे या लता करे. या बक्षिसाच्या रकमेसाठी त्या विना शूज अथवा चप्पल वापरता अक्षरशः अनवाणी आणि त्याही नऊवारी साडी नेसून धावल्या आणि स्पर्धा जिंकल्याही. प्रसिध्दी माध्यमांनी लताबाईंची दखल घेतल्यावर रातोरात त्या स्टार बनल्या. त्यांची संघर्षमय कहाणी ऐकून नवीन देशबोनाई यांनी त्यांच्यावर एक चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि विशेष बाब म्हणजे केवळ त्यांच्या जीवनावर चित्रपट आला नाही तर या सिनेमामध्ये त्यांनी स्वतः आपल्या पत्राची भूमिका देखील साकारली आहे.

अभिनयाचे आखी ज्ञान नसताना तसेच पाठी काहीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी हा सिनेमा मध्ये उत्कृष्ट काम करून जिद्दीनं त्याला पूर्णत्वाकडे नेले. परंतु, अजूनही त्यांना या गोष्टीवर विश्वास बसत नाही आहे कि, कोणी आपल्या जीवनावर चित्रपट तयार करेल व  त्यामध्ये आपल्यालाच भूमिका करायला मिळेल आणि त्याहून सर्वात विशेष बाब म्हणजे या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येईल याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. आपल्या संघर्षमय जीवनाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला,  ही गोष्ट माझ्यासाठी खूपच अभिमानास्पद आणि आनंददायी आहे.

- Advertisment -

Most Popular