33 C
Mumbai
Sunday, November 10, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeSports NewsCricketचेन्नई सुपर किंग्ज संघाने केली नवी जर्सी लाँच

चेन्नई सुपर किंग्ज संघाने केली नवी जर्सी लाँच

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कप्तान धोनीने या वर्षीच्या मोसमासाठी तयार केलेली जर्सीची पहिली झलक लाँच केली आहे. या जर्सीत बदल केलेला दिसत असून त्यामध्ये भारतीय लष्कराच्या कॅमोफ्लेजलाही समावेश करण्यात आला आहे.

आयपीएल स्पर्धा 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या वन-डे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे सध्या भारतीय चाहते भलतेच खूश आहेत पण आत्ता वाट पाहत आहेत या वर्षीच्या इंडियन प्रीमिअर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेची. सर्व संघ कसोशीने सराव करताना दिसत आहेत. अशामध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपली नवी जर्सी एका व्हिडीओ द्वारे लाँच केली आहे. या जर्सीचा वापर या वर्षीच्या आयपीएलमध्य एम. एस. धोनीचा  संघ करणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कप्तान धोनीने या वर्षीच्या मोसमासाठी तयार केलेली जर्सीची पहिली झलक लाँच केली आहे. या जर्सीत बदल केलेला दिसत असून त्यामध्ये भारतीय लष्कराच्या कॅमोफ्लेजलाही समावेश करण्यात आला आहे. चेन्नई सुपर किंग्जने भारतीय लष्कराच्या सन्मानार्थ असं डिझाइन तयार केलं आहे. चेन्नई संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून आज ही नवी जर्सी लाँच करताना धोनीचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला. या नव्या जर्सीचा रंग पिवळाच ठेवण्यात आला आहे पण त्यात खांद्याच्या जागी लष्कराचा कॅमोफ्लेज देण्यात आला आहे.

वर्ल्ड कप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला 2011 मध्ये टेरिटोरियल आर्मीने मानद लेफ्टनंट कर्नल पोस्ट देऊन गौरविले होते. धोनीच्या आयुष्यातील वर्ल्ड कपमधील विजयानंतरचा हा खूप महत्त्वाचा बनला होता असं मानलं जातं. त्यासाठी त्याने आवश्यक असणारे पॅरा कमांडो ट्रेनिंगही पूर्ण केलं आहे,  शिवाय हेलिकॉप्टरमधून पॅराशूटसह उडी मारण्याचा थरारही अनुभवला आहे. धोनीने 2019 सालच्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर काश्मीरमध्ये पॅराकमांडो ड्युटीही बजावली होती. एवढंच नाही तर भारताचा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट हा दिवस त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती जाहीर करण्यासाठी निवडला. भारतीय लष्कराबद्दल धोनीच्या मनात प्रचंड आदर आहे. त्याचंच प्रतिबिंब म्हणून आपल्या चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीत त्याने कॅमोफ्लेज समाविष्ट केलेला दिसतं आहे.

दुबईमध्ये गेल्या वर्षी पार पाडलेल्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाने केलेली कामगिरी फारशी चांगली नव्हती. चेन्नई संघ पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर होता. यंदाच्या  वर्षीच्या आयपीएल मध्ये चेन्नईने संघामध्ये नव्या खेळाडूंना स्थान दिले आहे आणि ते चांगलीचं कामगिरी करतील असा मानस आहे.  धोनीची वैयक्तिक कामगिरीही गेल्यावर्षीच्या स्पर्धेमध्ये चांगली नव्हती. खेळाच्या मानाने त्याचे वय जास्त असल्याने त्याच्या खेळण्यावर मर्यादा येत असल्याचं त्याच्या खेळण्यावरून जाणवले. त्यामुळे गेल्यावर्षीपासूनच कप्तान कुल माही 2021 मध्ये आयपीएल खेळेल का याच्या चर्चेला उधाण आले होते. परंतु, यंदाच्या वर्षी तो खेळणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर आता तो 2022 मध्ये आयपीएलमध्ये खेळणार का ! का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. माही कायम अशा प्रश्नांना आपल्या दमदार खेळीतून आणि उत्कृष्ट फलंदाजीतूनच उत्तर देत आला आहे त्यामुळे यावेळीही त्याच्याकडून हीच किमान अपेक्षा आहे.

पाहूया नवीन जर्सी यंदाच्या पर्वामध्ये कशी जादू करते ती. चेन्नईच्या नवीन जर्सीचा रंग पूर्वीसारखाच पिवळा असून, खांद्यावर भारतीय लष्कराचा सन्मान म्हणून आर्मीच्या ‘कॅमोफ्लॉज’चा समावेश केला गेला आहे. तसेच फ्रँचायझीच्या लोगोवर तीन स्टार देण्यात आले आहेत.  हे तीन स्टार 2010, 2011 आणि 2018 साली आयपीएल जिंकल्याचं चिन्ह दर्शवतात. या संदर्भात चेन्नई सुपर किंग्सने जर्सीचा पहिला लुक अनावरण करतानाचा धोनीचा एक व्हिडिओ शेअर करुन याबाबत माहिती सांगितली आहे.

CSK चे मुख्य कार्यकारी अधिकारी के.एस. विश्वनाथन यांनी प्रसिद्धीपत्रकातअसे म्हटले आहे कि, गेल्या अनेक दिवसांपासून “सशस्त्र दलाच्या महत्त्वपूर्ण आणि निःस्वार्थ भूमिकेबद्दल जागरूकता वाढविण्याचा मार्ग आम्ही शोधत होतो आणि हा कॅमोफ्लॉज त्यांच्या साठीच जर्सीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. तेच खरे नायक आहेत”.

- Advertisment -

Most Popular