सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चार दिवसांत चांदी ९६०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर!

लग्नसराईच्या काळात ग्राहकांना दिलासा: सोन्याचे भाव १७०० रुपयांनी उतरले.

Must read

जर तुम्ही येत्या काही दिवसांत सोन्याचे दागिने किंवा चांदीची भांडी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरांनी सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले होते, मात्र आता या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

सराफा बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अवघ्या चार दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल १,७०० रुपयांची कपात झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता २२ कॅरेट सोने खरेदी करताना मोठा फायदा होणार आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात तर याहूनही मोठी घसरण झाली असून चांदी तब्बल ९,६०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. एका किलो चांदीचा दर आता अंदाजे २,४०,८९० रुपयांच्या आसपास आला आहे.

लग्नासाठी खरेदी करणाऱ्यांची चंगळ: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. अशा काळात सोन्या-चांदीचे दर कमी होणे म्हणजे सर्वसामान्य कुटुंबांसाठी मोठी पर्वणीच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे ही दरवाढ कमी झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शनिवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरातही सुमारे ३९५ रुपयांची घसरण नोंदवली गेली, ज्यामुळे गुंतवणुकीसाठी सोने घेणाऱ्यांनाही चांगली संधी निर्माण झाली आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article