32 C
Mumbai
Friday, May 24, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeInternational Newsअमेरिकेने घातले कच्च्या मालावर निर्बंध

अमेरिकेने घातले कच्च्या मालावर निर्बंध

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकाने परिस्थिती हाताबाहेर जात चालली आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांमध्ये वाढताना दिसत आहे. लसीकरण सुरु असले तरी पण संक्रमितांच्या संख्येत फरक पडत नाही. या संकटकाळी आता अमेरिकेने भारतात येणाऱ्या कोरोना लसीच्या कच्चा मालावर निर्बंध लावले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्पष्ट केल आहे कि, प्रथम अमेरिकेच्या नागरिकांना लस उपलब्ध करून देणं हे अमेरिकन सरकारचे कर्तव्य आहे, तसेच अमेरिकेतील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करण्यावर अमेरिकन सरकार प्रथम प्राधान्य देणार आहे. त्यामुळे या प्रकरणात बायडेन प्रशासनाकडून अमेरिका फर्स्ट हे धोरण अवलंबण्यात येत आहे.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासूनच अमेरिकेमध्ये इतर जगाच्या तुलनेत कोरोनाचे संसर्ग मोठ्या प्रमाणात झालेला. त्यामुळे अमेरिकेला आतापर्यंत मोठ्या आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. तसेच सुमारे साडे पाच लाख लोकांना अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यूने कवटाळले आहे. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आल्याचं बायडन सरकारने स्पष्ट केलं आहे. अमेरिकेच्या या निर्णयाने भारतात सुरू असलेल्या लसीकरणाच्या कार्यक्रमावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शंका अनेकांनी व्यक्त केली आहे. देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत दररोज लाखोंच्या संख्येत वाढ होत आहे. आणि दरदिवशी वाढणाऱ्या रुग्णांचा आकडा वर वर वाढतच चालला गेला आहे. त्यामुळे भारताची अवस्था  अधिक गंभीर बनत चालली आहे.

गेल्या आठवड्यात सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी एक ट्वीट करुन अमेरिकन सरकारकडे विनंती केली होती कि, सरकारने कोरोना लसीच्या कच्चा मालाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्यात यावेत. अमेरिकेने लावलेले लसीच्या कच्चा मालाच्या निर्यातीवरील हे निर्बंध उठवावे यासाठी भारतही प्रयत्नशील  आहे. परंतु, अमेरिकेने याबाबतीत भारताला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. अमेरिका फर्स्ट या तत्वामुळे कोरोना लस तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यात बंदी हटवण्यास अमेरिका तयार नाही आहे. आणि अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की,  आम्ही भारताची विनंती मान्य करण्याआधी आम्हाला आमच्या नागरिकांना प्रथम प्राथमिकता देणे गरजेचे आहे. अमेरिकन जनते सोबत आमची विशेष जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले. जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित अमेरिकेत आहेत. अमेरिकेतही लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. अशातच देशाच्या लस निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी डिफेन्स प्रॉडक्शन अॅक्टचा अवलंब करत बायडन सरकारने कच्च्या मालावर निर्यात बंदी आणली आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश असून पण भारतात लसीकरण मोहीम सगळीकडे राबवणे सुरु असूनसुद्धा कोरोना संक्रमीतांची संख्या सातत्याने भरपूर प्रमाणत वाढतचं आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताने लस निर्यातीवर बंदी घातली आहे. देशात कोरोनाच्या संसर्गाला थोपवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लशीची उपलब्धता होणे गरजेचे आहे.

- Advertisment -

Most Popular