30 C
Mumbai
Wednesday, December 11, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeIndia Newsमहाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत कडक निर्बंध

महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत कडक निर्बंध

दिल्लीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या जलद गतीने वाढत आहे. शुक्रवारी सकाळची आकडेवारी लक्षात घेता दिल्लीमध्ये एकाच दिवसात 7,437 कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे तर 24 जणांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या जलद गतीने वाढत आहे. शुक्रवारी सकाळची आकडेवारी लक्षात घेता दिल्लीमध्ये एकाच दिवसात 7,437 कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे तर 24 जणांचा मृत्यू झाला आहे. त्या आधीच्या दिवशी 5,506 रुग्णाची भर पडली होती. आतापर्यंत दिल्लीमध्ये 6,98,008 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 11,157 रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

देशातील अनेक राज्यांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे त्या-त्या राज्य सरकारांनी काही कडक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने याआधीही अशा प्रकारचे  निर्णय घेतले आहेत. वेगवेगळ्या राज्यांप्रमाणे कोरोनाची स्थिती पाहता, काही राज्यात मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे तर काही राज्यात नाईट कर्फ्यूही लावण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्येही शनिवार आणि रविवार पूर्ण दिवस वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला असून राज्य सरकारने अनेक निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

india lockdown

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं चित्र आहे. राज्यात शुक्रवारी 58,993 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे नवीन 45,391 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 2,69,5148 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 5,34,603 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.96% झाले आहे. गुरूवारी 56 हजार 286 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.

शहर आणि जिल्ह्यात दररोज 10 ते 11 हजार कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. रूग्णांची वाढती संख्या आणि कुठेतरी ही वाढती साखळी तोडण्यासाठी सरकारने कडक निर्बध लागू केले आहेत. त्यामुळे पोलिसांनी असा इशाराच दिलेला आहे कि, जनतेने विनाकारण भटकंती न करता घरातच बसून रहावे, अन्यथा तुमच्यावर वाहनजप्तीच्या कारवाईसह दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागेल. विनाकारण भटकंती करण्याऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह वाहनजप्ती केली जाणार आहे. नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. नाका बंदीदरम्यान बेशिस्त आणि विनाकारण वाहन चालकांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

नागरिकांनी शनिवार आणि रविवारी घरातच राहिले पाहिजे. विनाकारण घराबाहेर पडल्यास संसर्गाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली काही जण बाहेर विनाकारण फिरताना दिसून गैरफायदा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाकाबंदीदरम्यान तसे काही आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याच इशारा पोलिसांनी दिला आहे.

- Advertisment -

Most Popular