गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील शैक्षणिक संस्था, सार्वजनिक ठिकाणे, पर्यटन स्थळे, खाजगी वाहने, रेल्वे इ. गोष्टींवर बंदी घालण्यात आली होती. गेले ७ महिने राज्यामध्ये मुलभूत गरजा त्यासुद्धा शासकीय नियमावलीनुसार असून त्या व्यतिरिक्त सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. सरकारकडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत.
सध्या सर्वात गाजावाजा असलेला विषय म्हणजे ऑनलाइन शिक्षण पद्धती. खरच मुलांना ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा योग्य वापर करता आला का? खरचं हि पद्धती विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे का? पालक आणि विद्यार्थ्यांची वैचारिक पटली या शिक्षण पद्धतीला जुळवून घेण्यास तयार आहे का? शिक्षकांसमोर सुद्धा हे मोठे आव्हानचं आहे. त्यानंतर राहिला प्रश्न ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थी आणि पालकांचा. शहरी भागांमध्ये इंटरनेट,मोबाईल या सुविधा सहजगत्या उपलब्ध होऊ शकतात. परंतु ग्रामीण भागाचे काय? तिथे या सुविधा उपलब्ध होणे अतिशय कठीण बनले आहे.मग त्या भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आ वासून पालक आणि शिक्षकांसमोर उभा राहिला आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे शिक्षण व्यवस्थेवर फार मोठा परिणाम होताना आढळतो आहे. राज्यातील शाळा दिवाळी नंतर म्हणजेच २३ नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा विचार आहे असे शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी म्हटले आहे. तसेच ११ वी च्या प्रबेश प्रक्रियेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच बैठक घेणार आहेत. बैठकीत विद्यार्थी हिताचाच निर्णय होईल असेही त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु केल्या जातील. सध्या ९ वी ते १२ वी च्या वर्गांचे २३ नोव्हेंबरला सुरु करण्याची शक्यता. नाहीतर १० वी व १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षा एप्रिल – मे पर्यंत निकाल लागणे अशक्यप्राय होईल. त्यांचे शैक्षणिक वर्ष महत्वाचे असल्याने त्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या शाळा आधी सुरु करण्याबाबत विचार केला जाईल. राज्य सरकार सध्या सर्व पर्यायांवर विचार विनिमय करून करत आहे. कारण सरसकट शाळा सुरु करून विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याशी सरकार खेळणार नाही व त्यांचे आरोग्य धोक्यात घालणार नाही, असे शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सर्व जनतेचे लक्ष राज्य सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे.