28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeTech Newsव्हाट्सएपच्या माध्यमातून आत्ता पैसे पाठवणे शक्य !

व्हाट्सएपच्या माध्यमातून आत्ता पैसे पाठवणे शक्य !

सर्व जगभर सोशल नेटवर्किंग अँपचा बोलबाला आहे. त्यामध्ये प्रसिद्ध ऍप व्हाट्सएप आहे. जसे व्हाट्सएप वर मॅसेज करणे सोप्पे आहे, तसेच आत्ता गुगल पे, फोन पे, प्रमाणे पैसे ट्रान्सफर करणे ही सहज आणि सोप्पे होणार आहे. एकाच अप्लिकेशनमध्ये विविध सुविधा असतील तर त्या अप्लिकेशनचा वापर मोठ्या प्रमाणात सर्वत्र केला जातो.  त्यामुळे वाढत्या मागणीमुळे व आपले अप्लिकेशन अप-टूडेट रहावे यासाठी विविध कंपन्या कायम युजर्सना गरज आणि मागणी यांचा विचार करून कंपनी आपापल्या वेगवेगळ्या अप्लिकेशनमध्ये बदल  घडवून आणत असते.

व्हाट्सएप मध्ये व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल, ग्रुप कॉल विविध प्रकारच्या सुविधा योग्य दर्जाच्या आहेत. त्यामध्येच आत्ता व्हाट्सएपच्या माध्यमातून पेमेंट ट्रान्सफर करण्याची सुविधा सुद्धा  लवकर सुरू करण्यात येणार आहे. व्हाट्सएपचे भारतात साधारण 350 दशलक्षाहुन जास्त वापरकर्ते आहेत. तुम्ही व्हाट्सअप वापर करत असल्यास व्हाट्सअप्प पे आपल्या मोबाईल ला सुरू करू शकता. ही सुविधा 1 जानेवारी 2021 पासून सर्वत्र कार्यान्वित होणार आहे.

तर आत्ता थोडक्यात व्हाट्सअप्प पे बद्दल माहिती जाणून घेऊया.

सर्वप्रथम ऍप अपडेशनचा तूम्हाला मॅसेज येईल ते अपडेट करुन झालयावर, सेटिंग्जमधून पेमेंट पर्यायाचा वापर करन , यामध्ये ऍड न्यू पेमेंट हा पर्याय मिळेल. ते कार्यान्वित करून नवीन पेमेंट पद्धत जोडायची. आपले खाते ज्या बॅंकेमध्ये आहे,  तेथे विविध बँकेच्या नावाची यादी पपाहायला मिळेल त्यातील आपली बँक निवडून, खात्याची माहिती दिल्यावर खाते एसएमएस च्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करून, त्यानंतर व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर पेमेंट फिनिश पर्यायाच अवलंब करून सेट्टींग्स पूर्ण कराव्यात. आणि याआधी आपण जसे पॅनकार्ड, आधार कार्ड , अकाउंटला लिंक करत असू. आत्ता तर तुमचा मोबाईल नंबर  सेम असेल तर ते व्हाट्सअप्प अकाउंट तुम्ही बँकेला लिंक करू शकता. गुगल पे, फोन पे,  सारख्या ऍपमध्ये जशा यूपीआय आयडी च्या सुविधा असतात, त्या सुविधा व्हाट्सअप्प पे मध्य सुद्धा प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. हे सर्व सेट अप पूर्ण झाल्यावर व्हाट्सअप्प वरही मेसेजप्रमाणे पैसे पाठवू शकता. चॅट बॉक्स उघडून, त्याला ऍटचमेन्ट चिन्हावर जाऊन पेमेंट टॅब वापरून अमाउंट घालायची आहे. व पैसे पाठवताना सोबत नोट्स अथवा पेमेंट डीटेल्ससुद्धा तुम्ही लिहून पाठवू शकता. सध्याच्या जगात जसे माणसाने अप टू डेट राहिले पाहिजे, त्या प्रमाणे अप्लिकेशनसुद्धा कुठे मागे राहिल्या नाहीत.

- Advertisment -

Most Popular