26 C
Mumbai
Friday, July 19, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeIndia Newsममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान

ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं दमदार विजय मिळवत इतिहास कायम ठेवला आहे. जनतेने तृणमूल काँग्रेसला राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याची संधी दिली आहे. २९२ विधानसभा मतदारसंघांपैंकी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत एकूण २१३ जागांवर तृणमूल काँग्रेसने विजयी पताका झळकावली आहे. बहुमतापेक्षा सुद्धा हा आकडा खूपच मोठा आहे. या निवडणुकीमध्ये बहुमत मिळवण्याचा दावा ठोकणाऱ्या भाजपला केवळ ७७ जागावरच समाधान मानावे लागले आहे.

पश्चिम बंगालमध्ये विजय संपादन केल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी आज राज्यात सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कोरोनाच्या प्रभावामुळे राजभवनात निष्पन्न झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये राज्यपाल जगदीप धनखड यांनी ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली. परंतु, शपथविधी नंतर राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री विरुद्ध राज्यपाल सामना रंगणार, याची एक लहानशी झलक पाहायला मिळाली. शपथविधी दरम्यान काही वेळामध्येच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड याच्यात वाद निर्माण झालेत. ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे कि, आमचं प्रथम ध्येय कोरोना संकटावर कोणत्याही परिस्थितीमध्ये नियंत्रणात आणणे हीच असेल, यासंदर्भात आज दुपारी १२.३० वाजता एक बैठकही आयोजित करण्यात  आली आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ३.०० वाजता यासंदर्भातील माहिती सर्वाना देण्यात येईल.  सोबतच, पश्चिम बंगालमध्ये अशांती पसरलेली पसंत नाही, संयम ठेवा आणि कोणत्याही हिंसाचाराला बळी पडू नका. आजपासून आमचं सरकार कायदे-व्यवस्था स्वत:च्या हातात घेत आहे. अशा वेळी राज्यात शांती आणि सुव्यवस्था लागू करण्यावर आपलं प्रथम प्राधान्य राहील. हिंसाचारात सहभागी होणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शपथविधीनंतर दिला.

Mamata Banerjee is the Chief Minister for the third time

यानंतर राज्यपाल जगदीप धनखड यांनी ममता बॅनर्जींना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. राज्यात सरकार संविधान आणि कायद्याच्या पद्धतीने काम करेल. भारतात लोकशाही आहे, इथे सरकार कायद्यानुसार चालतं. आपण एका भयानक महामारीचा सामना करत आहोत. लोक बंगालविषयीच्या काळजीत आहेत, अशा बातम्या माझ्या कानावर येत आहेत. मी मुख्यमंत्र्यांनाही यासंबंधी चर्चा केलीय. निवडणुकी नंतर राज्यात फोफावलेला हिंसाचार जनतेसाठी धोकादायक आहे, असं धनखड यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री मुख्यत: महिला आणि मुलांना ज्या अडचणींचा सामना करावा लगत आहे, त्यांना मुख्यत्वे करून मदत केली पाहिजे. मुख्यमंत्री,  माझी लहान बहीण ममता बॅनर्जी यावर नक्कीच कारवाई करतील, कारण सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदी निवडून येऊन विराजमान होणं सोप्पं नाही. नव्या पद्धतीनं तुम्ही सत्ता हाताळाल, अशी आशा बाळगत आहे.

- Advertisment -

Most Popular