27 C
Mumbai
Thursday, September 12, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...
HomeIndia Newsनो लिमिट्स मदतीस रतन टाटा

नो लिमिट्स मदतीस रतन टाटा

देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती आणखीनच चिंताजनक बनत चालली असून, कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या दोन कोटींच्या आसपास पोहोचली आहे. रोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये लाखाच्या पटीत नवीन रुग्ण आढळून येत आहेत. तर ३ लाख ७३२ रुग्ण बरे झाल्याची सकारात्मक बातमी सुद्धा ऐकायला मिळते आहे.

आतापर्यंत अंदाजे मिळालेल्या माहितीनुसार १६,२९,३०३ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत, तर मुत्युमुखी पडलेल्यांची अंदाजे संख्या २,१८,९५९ दरम्यान आहे. देशात बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८१.७७ टक्के झाले आहे. कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यांमधील रुग्णालयांची दाखल क्षमताचं संपली असल्यानं आरोग्य व्यवस्थाचं आत्ता व्हेंटिलेटरवर असल्याचं चित्र समोर येत आहे. जेवढा आरोग्य यंत्रणेवर ताण आहे, तेवढेच अपुर्या सुविधेमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी रुग्णालयातील परिस्थिती अतिशय विदारक आहे. रुग्णांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच योग्य वेळी देशाच्या मदतीसाठी कायम अग्रस्थानी असणारे टाटा समूह पुन्हा धावून आला आहे.

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी एकत्रितपणे नो लिमिट मदतीची एक योजना तयार केली आहे. टाटा समूहाच्या विविध भागातील कंपन्या काही रक्कम गोळा करत आहे, ज्यातून ज्या गोष्टींची कमतरता सध्या जाणवत आहे, जसे कि, हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजनचा पुरवठा, तसेच आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देऊन परिपक्व करणे, या गोष्टी सहजरित्या शक्य होऊ शकतील. टाटा समूहाने या योजनेसाठी २,००० कोटी रुपये खर्च करण्याचा निश्चय केला आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान तीन महिन्यामध्ये टाटा समूहाची जो काही नफा झाला असेल, त्या रकमेतून ते २,००० कोटी रुपये टाटा समूह गुंतवणार असल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच करून थांबणार नाहीत तर आता टाटा समूह आपल्यासोबत लस उत्पादक कंपन्यां सोबतही करार करण्याच्या विचारात असल्याची माहिती कळली आहे.

ratan tata msg to indian people

इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स अॅंड एअरोस्पेस आणि टाटा सन्सचे अध्यक्ष बनमाली अग्रवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा मोटर्स, भारतीय हॉटेल्स, टाटा स्टील, टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स, टीसीएस, टाटा इंटरनॅशनल, व्होल्टास आणि टाटा प्रोजेक्ट्स अशा सर्व टाटाच्या कंपन्या कोरोनाच्या या महामारीमध्ये देशाला मदत करण्यासाठी आपापल्या परीने काही रक्कम देण्यास पुढे सरसावले आहेत. निधी संकलानाबरोबरच विविध स्त्रोतांच्या माध्यमातून हजारो अद्ययावत हॉस्पिटल्स उभारण्याचे, तसेच ऑक्सिजनचं व्यवस्थापन आणि फ्रंटलाइन वर्कर्स, आरोग्य विभागाशी संबंधित स्टाफला ट्रेनिंग यासारख्या गोष्टींचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी टाटा ग्रुप सुमारे २,००० कोटी रुपये खर्च करणार असून यासाठी खर्चाच्या मर्यादेला लिमिट ठेवलेलं नाही. रतन टाटा हे देशासाठी कायमच संकटकाळी मदतीला पोहोचतात, तसेच संकटातील लोकांना मदत करण्यासाठी कायमच अग्रस्थानी असतात. तसेच संपूर्ण देशाला मदत करण्यासाठी टाटा समूह हा नेहमीच अशा प्रकारच्या मोठ्या संकटवेळी तत्पर असतो.

- Advertisment -

Most Popular