30 C
Mumbai
Monday, October 21, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeDevotionदेशात रामनवमी साधेपणाने साजरी

देशात रामनवमी साधेपणाने साजरी

दरवर्षी राम नवमीचा उत्सव साजरा जगभर मोठ्या भक्तीभावाने केला जातो. रामनवमी हा हिंदूं धर्माच्या एका महत्वाच्या सणांपैकी एक आहे. चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी रामनवमी साजरी केली जाते. यावर्षी राम नवमी 21 एप्रिल या दिवशी येत आहे. भगवान विष्णूचा सातवा अवतार भगवान श्रीराम यांचा जन्मदिवस म्हणून सर्वत्र उत्साहात रामनवमी हा दिवस साजरा केला जातो. हा उत्सव अयोध्येचा राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या मुलाच्या रुपात जन्मलेल्या श्रीरामाचा जन्म म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विविध ठिकाणी प्रचंड गर्दी असते परंतु यंदा सगळीकडेच रामनवमी भक्तांशिवाय साजरी केली जाणार आहे, कोरोनामुळे सर्व धार्मिक स्थळांवर बंदी घालण्यात आल्याने आणि 15 दिवसाचा लॉकडाऊन शासनाने जाहीर केल्याने गर्दी न करता जनता ऑनलाईन दर्शन घेणेचं पसंद करत आहे.

रामाचा पाळणा

बाळा जो जो रे कुळभूषणा । दशरथनंदना ।
निद्रा करि बाळा मनमोहना । रामा लक्षुमणा ॥धृ॥
पाळणा लांबविला अयोध्येसी । दशरथाचे वंशी ।
पुत्र जन्मला हृषीकेशी । कौसल्येचे कुशी ॥१॥
रत्नजडित पालख । झळके अमोलिक ।
वरती पहुडले कुलदीपक । त्रिभुवननायक ॥२॥
हालवी कौसल्या सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी ।
पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जती जयजयकार ॥३॥

ramnavmi 2021

प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजता झाला. हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रीराम यांना भगवान श्री विष्णूचा सातवा अवतार मानला जातो. देशभरातील हिंदूंमध्ये रामनवमी पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. रामनवमीच्या बर्याच आख्यायिका सांगितल्या जातात. असे म्हणतात कि, रामनवमीला जो कोणी मनोभावे व्रत करतो त्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पुर्ण होतात. रामरक्षा पठणामुळे आयुष्यात येणार्या अडचणी आणि कष्टांचे निवारण होते असे मानतात. चालू वर्ष म्हणजेच भारतीय सौर 1 वैशाख शके 1943 आहे. भगवान राम यांचा जन्म सूर्यवंशी इक्ष्वाकु वंशमध्ये त्रेता युगात राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी पुत्र म्हणून अयोध्येत झालेला. त्यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला झाला होता. भगवान श्रीरामांचा जन्म मध्यमा काळात झाला असून, तो कालावधी सुमारे 2 ते 24 मिनिटांपर्यंत असतो, सकाळी 11:02 दुपारी 1:38 दुपारी वाजेपर्यंत हा काळ विधीसाठी सर्वात शुभ काळ मानला जातो. रामनवमीचे औचित्य साधून त्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही ठिकाणी भक्त बालक रुपातील श्रीरामाची पूजा करून करतात. अयोध्या शहराची ओळख ही भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान हीच आहे, म्हणून रामनवमीच्या निमित्ताने देशाविदेशातून भाविक दर्शनासाठीयेतात. भाविक हा शुभ दिवस उपवास, व्रत करुन आणि रामरक्षा पठन करुन साजरा करतात. तर काही लोक अयोध्येच्या काठी असलेल्या शरयू नदीत स्नान करून सुचिर्भूत होतात. रामनवमीच्या दिवशी या नदीच्या पवित्र पाण्याने स्नान करणे शुभ समजले जाते.

- Advertisment -

Most Popular