भारतातील ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते पहिले शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्यामुळे भारत देशाच्या सन्मानामध्ये जागतिक स्तरावर मान उंचावली आहे. ग्लोबल टीचर डिसले गुरुजी यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांसाठी 400 युरोची स्कॉलरशिप सुरु केली जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 विजेते रणजितसिंह डिसले गुरुजींनी आपल्या मिळालेल्या एकूण 7 कोटींच्या पुरस्कारामधून निम्मी म्हणजेच तब्बल साडेतीन कोटींची रक्कम नऊ देशातील सहभागी शिक्षकांमध्ये विभागून दिली. इटलीचे कार्लो मझुने हेही त्याच्यापैकी एक होत. शिक्षण क्षेत्रातील त्यांचं हे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान ठरणार आहे.
रणजितसिंह डिसले शिष्युवृत्ती
बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी या शिष्युवृत्तीसाठी मुलांची निवड करणार असून, पुढील किमान 10 वर्षे तरी 100 मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. इटलीतील सॅमनिटे राज्यातील 10 विद्यार्थ्यांना ही 400 युरोंची शिष्यवृत्ती कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप यांच्या नावाने प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यासाठी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना प्रस्ताव पाठवायला सांगितले आहेत.
🇮🇳 🤝 🇮🇹
Inviting applications for the scholarship entitled "Carlo Mazzone – Ranjit Disale" for any post-diploma training students from Samnite
province of 🇮🇹.
Glad to see fellow finalists of @TeacherPrize are helping students to continue their education. pic.twitter.com/DQAnTdDFvm— Ranjitsinh (@ranjitdisale) April 19, 2021
लंडनस्थित वार्की फाउंडेशन व युनेस्को यांच्याकडून संयुक्तरित्या दिला जाणाऱ्या ग्लोबल टीचर पुरस्कार प्रथमच एका भारतीय शिक्षकाला जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्रातील सोलापूरमधील परीतेवाडी शाळेतील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा जागतिक दर्जाचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये पार पडलेल्या समारंभामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांच्यामार्फत अधिकृत घोषणा देखील करण्यात आली होती. जागतिक पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय शिक्षक म्हणून रणजितसिंह यांच्या नावाची नोंद झाली आहे. तसेच सर्वात जास्त कौतुकास्पद म्हणजे रणजीतसिंह डिसले यांनी पुरस्कारामधील 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 सहभागी सहशिक्षकांना विभागून दिली. यामुळे 9 देशांतील हजारो मुल गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतील, अशी त्यांची इच्छा आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत रणजितसिंह डिसले शिक्षक म्हणून कार्यरत असून, विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने डीजीटल शिक्षणासाठी डिसले गुरुजींचे नाव साता समुद्रापलीकडे प्रसिद्ध आहे. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे; तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसेव्ही होण्यासाठी कायम प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारून लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकविले. डिसले गुरुजींनी तयार केलेली QR कोडेच्या माध्यमातील पुस्तकांचा वापर आज ११ देशांमधील दहा कोटीहून अधिक मुले करत आहेत. व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या वेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमाने ते १५० हून अधिक देशामध्ये विज्ञान विषयाचे ज्ञान देतात.