28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeTech Newsव्हॉट्सअॅपचं मेसेज शेड्यूल नवीन फीचर्स

व्हॉट्सअॅपचं मेसेज शेड्यूल नवीन फीचर्स

सध्या सगळ्यांच्या गरजेचं इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप बनलं आहे. हे अॅप केवळ चॅटिंगपुरतं मर्यादित राहिलेलं नसून यामध्ये वॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगसह नवीन फीचर्स पेमेंट करण्याचीही सुविधाही उपलब्ध आहे. हे अॅप कायमच आपल्या युजरच्या आवश्यक मागण्यांचा पुरवठा करताना दिसत. बऱ्याचवेळा आपल्या खास मित्र-मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रात्री 12 वाजायची वाट पाहत बसतो. तसेच एखाद्याला महत्त्वाचा मेसेज ठराविक वेळी पाठवायचा असतो पण तोपर्यंत वाट पाहत बसण्याची इच्छा नसते. पण या बातमीच्या माध्यमातून एक सोलिड युक्ती सांगणार आहोत, जी वापरून तुम्ही तुमच्या खास लोकांना खुश करू शकता आणि शुभेच्छा देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागं राहण्याची गरज भासणार नाही. पण तुमचा मेसेज मात्र ठरविलेल्या त्या वेळेतच संबंधितांना मिळेल.

whatsapp schedule messages

तुम्ही व्हॉट्सअॅप वर मेसेज शेड्यूल करु शकता. जर तुम्हाला एखाद्याला 12 वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील किंवा एखादा महत्त्वाचा मेसेज करायचा असेल तर जागरण न करता ही युक्ती तुम्हाला उपयुक्त ठरू शकणार आहे. व्हॉट्सअॅपवर मेसेज असे शेड्यूल करा, व्हॉट्सअॅपवर मेसेज शेड्यूल करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर WhatsApp Scheduler, Do It Later, SKEDit यांसारखी बरीच अॅप उपलब्ध आहेत. जी तुम्हाला व्हॉट्सअॅप मेसेज शेड्यूल करण्यास सहाय्यक बनू शकतात.

विशेष म्हणजे या अॅपच्या माध्यमातून तुम्ही केवळ टेक्स्ट मेसेजच नव्हे तर, व्हिडिओ आणि फोटोही शेड्यूल करुन पाठवू शकता. पण या प्रकारची अॅप घेताना एका गोष्टीचे ध्यान ठेवणे गरजेचे आहे कि, या अॅपची अपडेटेड व्हर्जन तुम्हाला डाऊनलोड करून घ्यावी लागतील. यानंतरचं अॅप ओपन करुन साईन अप करून आता लॉगइन झाल्यानंतर मेन्यूमध्ये दिलेल्या व्हॉट्सअॅप ऑप्शनवर टॅप करा. हे केल्यानंतर तुमच्याकडून काही परवानग्या मागितल्या जातील. आता Enable Accessibility वरुन Use service वर क्लिक करा. आता तुम्हाला ज्या व्यक्तीला मेसेज शेड्यूल करायचं आहे, त्याचा कॉन्टॅक्ट नेम तिथे लिस्टला अॅड करा. मग मेसेज टाईप केल्यावर तारीख आणि वेळ सेट करायची. त्यानंतर सेट केलेल्या दिनांक आणि मेसेज आपोआप वेळेवर संबंधित कॉन्टॅक्टला जाईल. मेसेज शेड्युल करताना काही अडचण आल्यास हीच प्रक्रिया पुन्हा केली असता वेळेवर मेसेज शेड्यूल होतो. काही तांत्रिक अडचण वगळता तुमचा मेसेज योग्य पद्धतीने ठराविक वेळेवर शेड्युल होऊ शकतो.

- Advertisment -

Most Popular