33 C
Mumbai
Friday, October 11, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeMaharashtra Newsराज्यात पुन्हा लॉकडाऊन करणार कि नाही

राज्यात पुन्हा लॉकडाऊन करणार कि नाही

कोरोना बाधितांचा आकडा काही प्रमाणात कमी जास्त झालेला आढळतो आहे. राज्यात लॉकडाऊन होणार कि नाही या संदर्भात विविध तर्कवितरकांना जोर चढला आहे. त्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  लॉकडाऊन होणार नाही, परंतु, नियमांची अतिशय कडकपाने अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं त्यानी सांगितलं. तसेच कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाला त्यांच्या स्तरावर पूर्णपणे अधिकार देण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी जशा उपाययोजना करणं आवश्यक आहे,  त्या ठिकाणी त्याप्रमाणे त्या करण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याची चिन्हे दिसत आहेत, त्या सर्व ठिकाणी योग्य आणि आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. सध्या तरी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पुन्हा लॉकडाऊन करणे हा शेवटचा पर्याय असेल. कोरोनाच्या एकूण स्थितीवर शासन लक्ष ठेवून आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागावे. ज्याप्रमाणे गरज पडेल त्याप्रमाणे काळजी घेण्यात येईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सद्य कोरोना स्थितीवर भाष्य केले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे पुढे म्हणाले की, कोरोना बाधितांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असे नाही. परंतु, महामारीचा भडका उडण्यापेक्षा वेळीच खबरदारी घेतलेली योग्य. संख्या थोडीफार वाढत असते, पुन्हा प्रमाण थोडे कमी होते. अचानक कोणतेही संकट येत नाही, त्यामुळे दोन – तीन हजारांच्या दरम्यान रोज वाढ होण्यामागचे प्रमाण मागील दोन-तीन महिन्यांपासून चालू आहे. कोरोनाचा संसर्ग थोड्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे काळजी घेण्याची सुरुवात स्वत: पासून करणे आवश्यक आहे. त्यामुळे  प्रत्येकाला कोरोना संबंधित नियमांचं पालन करने गरजेच आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा डोक वर काढताना दिसत असल्याने नाईलाजास्तव काही कडक धोरण अवलंबवावी लागणार आहेत, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला. परंतु राज्यात पुन्हा लॉकडाऊन करायचे कि नाही, याचा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरचं घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केलं होते. त्यानंतर कोविड महामारी विषयी संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील कलेक्टर आणि विभागीय आयुक्त यांच्या सोबत ऑनलाईन कॉन्फरन्सिंगद्वारे मिटिंग घेण्यात आली. या मिटिंगनंतर काही महत्त्वाच्या सूचना लागू करत त्या अंमलात आणण्यासाठी राज्य शासनाने त्या कडकपणे अमलात आणणे गरजेचे असल्याचं स्पष्ट झालं. तूर्तास तरी राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही अशीच चर्चा समोर आहे.

सर्व व्यवहार पूर्वी सारखे सुरू झाले, निर्बंधामध्ये शिथिलता आणण्यात आली, त्यामुळे तरुणाई घराबाहेर पडू लागली आहे, त्यात जणू काही कोरोना पूर्ण संपुष्टात आला असे सगळे वागत आहेत. राज्यात पुन्हा लॉकडाऊन सुरु केले पाहिजे की काही नियमांचे पालन करून मोकळे राहायचे ते स्वत: जनतेने ठरवायचे आहे. सार्वजनिक ठिकाणी लोक मास्क घालत नाहीत. लोकं दिलेले आरोग्याचे नियम अमलात आणत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे, त्यांनी अजिबात दयामाया न दाखवता दोषींवर कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई करावी असे राज्य प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कारण आपल्याच घरातील लहान मुल, वयोवृद्ध आणि ज्येष्ठांचं आरोग्य आपणचं एका प्रकारे धोक्यात आणतो आहोत ही बाब इथं विशेषत: सांगण्यात आली. कोरोनामुळे  काही दिवसांपासून थांबलेले किंवा लांबणीवर पडलेले लग्न समारंभ पुन्हा जोशात सुरू झाले आहेत. लोकांच्या भेटी, समारंभ आणि सामाजिक कार्य कुठल्याही निर्बंधाविना होतांना दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल्सच्या वेळा योग्य मर्यादेत ठरवून दिल्या आहेत, परंतु तिथही परिस्थिती सारखीच दिसून येत आहे. तेथेही नियमांचं पालन करताना दिसत नाही, त्यामुळे स्थानिक प्रशासन पथकांनी अशा ठिकाणी जाऊन त्वरित कडक कारवाई करावी. ज्या विवाह किंवा इतर मोठ्या समारंभात कोरोन संदर्भित नियम पाळलेले दिसणार नाहीत जसे कि, मास्कचा वापर, सोशल डीस्टन्स, त्या ठिकाणच्या सभागृहांवर लायसन्स रद्द करण्याची त्वरित कारवाई केली पाहिजे अशा कडक सूचना शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी पालिकांनी जंतुनाशक फवारणी नियमित करून, गावांमध्ये जाऊन प्रचाराची मोहीम वाढवावी.

- Advertisment -

Most Popular