34 C
Mumbai
Thursday, May 16, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeSports NewsCricketटीम इंडियाची दमदार कामगिरी

टीम इंडियाची दमदार कामगिरी

भारताने अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १० विकेटनी विजय मिळवला असून या चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम टॉस जिंकून सामन्याला सुरुवात केली. पहिला डाव त्यांचा फक्त ११२ धावांवर संपला. त्यानंतर पहिल्या डावात भारतीय संघाने १४५ धावा करत ३३ धावांची लीड घेतली. इंग्लंडला दुसऱ्या डावात फक्त ८१ धावा करता आल्या, त्यामुळे भारताला विजय मिळविण्यासाठी फक्त ४९ धावांचे आव्हान स्वीकारावे लागले. भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवून, सहज हे लक्ष्य पार केले. दोन्ही संघाचा चौथा आणि अखेरचा कसोटी सामना याच स्टेडियमवर खेळला जाणार आहे. इंग्लंडचा संघ या पराभवासह आयसीस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर भारतीय संघाने चौथी कसोटी जरी ड्रॉ केली तरी फायनलमध्ये ते पोहोचतील. याच्या उलट जर चौथा सामना इंग्लंडने जिंकला तर फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया पोहोचेल.

टीम इंडिया मधील आर अश्विनने कसोटी कारकिर्दीमधील ४०० विकेटचा टप्पा यशस्वीरीत्या पार केला आहे. भारताचा अशी कामगिरी करणारा तो चौथा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने ४०० विकेट ७७ कसोटी सामन्यातून घेतल्या आणि भारताकडून वेगवान ४०० विकेट घेण्याचा नवीन विक्रम स्वत:च्या नावावर कोरून घेतला. अनिल कुंबळेच्या नावावर पूर्वी हा विक्रम होता. तर श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने जागतिक क्रिकेटमध्ये ७२ कसोटीत ४०० विकेट घेतल्या होत्या. परंतु, त्या आधीही भारतीय खेळाडूंपैकी कपिल देव, अनिल कुंबळे, हरभजन सिंग यांनी अशी दमदार कामगिरी केली आहे. टीममधील  अक्षर पटेलने पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या. डे-नाइट कसोटी सामन्यामध्ये ७० धावा देउन ११ विकेट घेण्याची कामगिरी त्याने केली आहे. कसोटीच्या या इतिहासातील कोणत्याही गोलंदाजाने केलेली ही ऊत्तम कामगिरी आहे. त्याचप्रमाणे इंग्लंडचा कर्णधार जो रूटनेही भारताच्या पहिल्या डावात सर्वाधिक म्हणजे पाच विकेट घेतल्या होत्या. संपूर्ण कारकीर्दीमध्ये पाच विकेट घेण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. तर इंग्लंडकडून डे-नाइटमध्ये झालेली ही सर्वोत्तम गोलंदाजी मानली जाते.

कसोटी क्रिकेटच्या इतिहास दोन दिवसांत सामन्याचा निकाल येण्याची कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही २२ वी वेळ आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर येथे खेळला गेलेला हा कसोटी सामना दुसर्‍याच दिवशी आटोपला. विशेष म्हणजे, या कारकीर्दीमध्ये इंग्लंड संघाचा सहभाग १३ वेळा होता. या १३ सामन्यामध्ये चार वेळा इंग्लंडचा पराभव झालेला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेमध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ११२ धावा केलेल्या. व पहिल्या डावात भारतीय संघाने १४५ धावा केल्या. अशाप्रकारे पहिल्या डावात भारताने ३३ धावांची लीड मिळवली परंतु, यानंतर इंग्लंडचा संघ दुसर्‍या डावात ८१ धावांवरचं ऑलआऊट झाला आणि भारताला ४९ धावांचे लक्ष्य दिले गेले, ते भारतीय संघाने नाबाद राहून एकही विकेट न गमावता ७.४ षटकांत पूर्ण केले. अशाप्रकारे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यामध्ये भारताने इंग्लंडचा दुसर्‍या दिवशी १० प्लेयर राखून पराभव केला. या यशासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली. रोहित शर्माने २५ बॉलमध्ये ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद २५ धावा काढल्या तर शुभमन गिलने २१ बॉलमध्ये १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १५ धावांवर नाबाद राहून इंग्लंडवर विजय मिळविला.

- Advertisment -

Most Popular