30 C
Mumbai
Friday, October 11, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeMaharashtra Newsमराठी भाषा गौरव दिन विशेष

मराठी भाषा गौरव दिन विशेष

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी ! अशा प्रकारच्या एक ना अनेक प्रकारचे स्टेटस आज प्रत्येकाच्या सोशल मिडिया प्रोफाइल वर सर्वाना दिसतील. दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कुसुमाग्रज यांचे मोलाचे योगदान असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. दिनांक २१ जानेवारी २०१३ रोजी आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून त्यासोबतच कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी मराठी राजभाषा दिन साजरा करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला. जागतिक मराठी अकादमीने याकामी विशेष पुढाकार घेतला आहे. समस्त मराठीजनाची आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हि एकमेव मागणी आहे. २७ फेब्रुवारी रोजी असणारा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन, या वर्षी शासनातर्फे गेट वे ऑफ इंडियावर भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होणार आहे. तेथे धन मराठी, धून मराठी, धन्य मराठी हा कार्यक्रम सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकार सादर करणार आहेत. तसेच यानिमित्ताने ‘एक परिच्छेद विकिपिडियावर’ अशी आणखी एक मोहिम हाती घेतली गेली आहे. यामध्ये मराठी भाषा गौरव दिनी, जगभरातील मराठी भाषीकांनी किमान १ परिच्छेद मजकूर मराठी देवनागरी लिपीमध्ये मराठी विकिपीडियावर टाईप करायचा आहे. सर्व आधुनिक भारतीय भाषांचे काही प्राचीन साहित्य मराठी भाषेत आहे, जे साधारण सहाशे वर्षांपूर्वीचे आहे. मराठीची मुख्य बोली प्रमाण भाषा मराठी हीच आहे आणि म्हणून तिला बोलिभाषा असे संबोधले जाते. प्रमुख्यतः महाराष्ट्र मध्ये या मराठी दिनाचे किंवा मराठी दिवसाचे महत्व सर्वात जास्त साजरे केले जाते. महाराष्ट्रामध्ये बहुतांश लोक मराठी भाषेतच बोलतात. तसेच संपूर्ण भारतात सुद्धा बोलली जाणारी म्हणून मराठी भाषेचा तिसरा क्रमांक लागतो. भारतातील मुख्य भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्र आणि गोव्याची अधिकृत भाषा असून ही पश्चिम भारताची राज्यभाषा आहे. मातृभाषेच्या संख्येवर मराठी भाषेचा जगात दहावा आणि भारतात तिसरा क्रमांक आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय समितीला लक्ष्य करून काहीही झाले तरी पुढच्या वर्षीच्या मराठी भाषा दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे, हे ध्येय प्रत्येक मराठी माणसाने बाळगले तर कोणाचीही  हा दर्जा न देण्याची हिंमत नाही. मुख्यमंत्र्यांनी मराठीची मोडतोड करणाऱ्यांना एक सणसणीत टोला लगावून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम नक्की कोणी करायचे आणि  का करायचे याच्या उत्तराची वाट न बघता, हे आपणच करायचे काम आहे. त्यात केवळ ‘हॅप्पी मराठी भाषा डे’ असे संदेश उद्या कोणी केला नाही म्हणजे मिळवले.  गेली काही वर्षापासून आपण हा मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो आहोत. माझ्यासाठी मुख्यमंत्री म्हणून हा दुसरा कार्यक्रम आहे. कोरोना संकटामुळे आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही परंतु अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण भेटतो आहोत, त्याला आभासी भेट असे म्हणतात. पण मराठी भाषे प्रतीची आपली तळमळ, भावना मराठी भाषेबद्दलचे प्रेम अजिबात आभासी नाही, हे मात्र मी इथे स्पष्ट करतो. मराठी भाषा आपल्या रक्तात भिनलेली आहे. माझी माती, माझी माता, माझी मातृभूमी, माझी मातृभाषा हा आपल्यासाठी अभिमानाचा व गौरवाचा विषय असून हा गौरव आपण स्वत:चं जपणे हे परमकर्तव्य आहे. याच भावनेतून एका ध्येयाने एकत्रित होऊन पुढे जाऊया, मग बघू छत्रपती शिवाजी महाराजांच्या, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही ते ,या शब्दाद्वारे मुख्यमंत्र्याच्या मनातील मराठी भाषेबद्दल घालमेल दिसून आली.

- Advertisment -

Most Popular