34 C
Mumbai
Thursday, May 16, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeEntertainmentBollywoodरंगीला गर्ल उर्मिलाचा कमबॅक

रंगीला गर्ल उर्मिलाचा कमबॅक

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लवकरच चित्रपटामध्ये कमबॅक करणार असल्याचे वृत्त आहे. गेली कित्येक वर्षे उर्मिला मातोंडकर चित्रपट सृष्टीपासून लांब आहेत. उर्मिला 3 मार्च 2016 रोजी तिचा बॉयफ्रेंड मोहसिन अख्तर मीर सोबत विवाह बंधनात अडकली. हा विवाह सोहळा वांद्रे येथील निवासस्थानी संपन्न झाला होता. मोहसिन हा काश्मीरी मुसलमान असल्या कारणाने विवाहा नंतर उर्मिलाला प्रचंड ट्रोलींगचा सामना कराव लागला होता. अजूनही या मुद्द्यावरुन तिच्यावर कायम टीपण्णी केली जाते. 2019 साली तिने राजकारणामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ती सिनेसृष्टीत परत येईल की नाही यावर कायम चर्चा केल्या जात होत्या. त्यानंतर मात्र तिने कमबॅक संदर्भात माहिती देताना सांगितलं की, लोकांच्या विश्वासावर तीचा येणारा चित्रपट हा उभा राहिल. उर्मिला मातोंडकरने सांगितले की, प्रेक्षकासाठी ती लवकरच एक चित्रपट घेऊन येत आहे. त्यानिमित्ताने  मोठ्या पडद्यावरती ती जोरदार पर्दापण करण्याच्या तयारीत आहे. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले की, ती एका वेबसिरिजचा देखील भाग होणार आहे. परंतु सध्या सुरु असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वेबसीरिजचं शूटिंग लांबणीवर गेलं आहे. एप्रिलमध्ये ही वेबसिरिज प्रदर्शित करण्यात येणार होती. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही ते शक्य झालं नाही. शूटिंगच्या तारखाही लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Urmila Matondkar

एका मुलाखतीमध्ये उर्मिला मातोंडकर म्हणाल्या कि, बॉलिवूडमध्ये दुसऱ्यांदा पदार्पण करण्याची हिच योग्यवेळ आहे, असे मला वाटतयं. जेव्हा मी माझ्या करिअरबद्दल विचार करते तेव्हा असं वाटतं की, माझ्या आतापर्यंतच्या करिअरचा प्रवास खूप शानदार झालेला असल्याने, मी नक्कीच प्रेक्षकांच्या हृदयात माझी जागा निर्माण केलेली आहे. माझे अनेक चित्रपट सुपरहिट झालेले आहेत. मला माहित नाही माझे पुढचे काम किती यशस्वी होईल कारण याबद्दल मी आधी विचार केलेला नाही. तिची कारकीर्द पाहता ९०च्या दशकामध्ये उर्मिला मातोंडकरने अनेक मोठे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांसोबत काम केले होते. १९८० साली वयाच्या सहाव्या वर्षी पहिलं उर्मिला मातोंडकरने श्रीराम लागू यांच्या ‘जाकोल’ या मराठी चित्रपटातून पदार्पण केले होते. पण म्हणतात ना कि, कुठे तरी आयुष्याच्या वळणावर यश उभे असते, तसा तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शन केलेला रंगीला चित्रपट ठरला. आजही उर्मिला मातोंडकर हिचा उल्लेख रंगीला गर्ल म्हणून केला जातो.

Urmila comeback

अभिनय क्षेत्रानंतर उर्मिला मातोंडकरच्या आयुष्याच्या दुसरया इनिंगला सुरुवात झाली, ती  राजकीय क्षेत्रात. उर्मिलाया नव्या करियरमध्ये अत्यंत व्यग्र असते. यावर बोलताना उर्मिला म्हणते की, हे करियर सिनेमापेक्षा वेगेळे असल्याने, राजकीय क्षेत्राला मी अधिक वेळ देत आहे. यात मी नवखी असले तरी त्याचा मी पूर्णपणे आस्वाद घेते आहे. ज्याप्रमाणे मला सिनेमा आणि अभिनय पसंद आहे, त्याप्रमाणे राजकरणामध्येही मला तेवढीच आवड आहे.

- Advertisment -

Most Popular