प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केलेला राजघराण्यातील काही खाजगी गोष्टींच्या उलगडयामुळे पुन्हा सगळ्या गोष्टी चर्चेत आले आहेत. बर्किंघम पॅलेसने जाहिर केलेल्या निवेदनामध्ये, मागील काही वर्षात प्रिन्स हॅरी आणि मेगन यांना कठीण काळाला सामोरे जावे लागल्याने संपूर्ण राजघराणे दु:खी झाल्याचे निवदेनामध्ये नमूद करण्यात आले आहे. वर्णद्वेषाचा मुद्दा हा चिंता करण्यासारखाचं आहे. या मुद्दयाला गंभीरपणे विचारात घेतले असून खासगीमध्ये राजघराणे यावर तोडगा नक्कीच काढेल. राजघराण्याच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात प्रिन्स हॅरी, मेगन आणि आर्ची हे कुटुंबातील सर्वात प्रिय सदस्य असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन यांनी आपल्या राजघराणे असलेल्या शाही कुटुंबावर वर्णद्वेषाचे आरोप केल्यानंतर सगळीकडे एके प्रकारे खळबळ उडाली. परंतु, या सर्व आरोपांवर ब्रिटनच्या महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांनी आपले मौन सोडून, शाही कुटुंबाच्यावतीने एक निवदेन जाहीर करण्यात आले असून प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्याबद्दल कुटुंबाला सहानुभूती वाटत असल्याचे व्यक्त केले गेले आहे.
पंतप्रधानांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीवरून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देखील प्रिन्स हॅरी आणि मेगन यांची मुलाखत पाहिली आहे परंतु, त्यांनी या वादावर टिप्पणी करण्यास नकार दिला. अमेरिकेतील प्रसिद्ध चॅट शो सेलिब्रिटी ओपरा विन्फ्रे यांना दिलेल्या मुलाखतीत दोन तास प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी स्वत:ची सविस्तर मते मांडली. त्यामध्ये राजमहालातील वर्णद्वेषाचा करावा लागलेला सामना, मेगन गर्भवती असताना तिच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाचा रंग कोणता असेल, यावरून झालेली टिप्पणी, त्यासंबंधीत चिंता त्यांनी मांडल्या. या सगळ्या प्रकारामुळे मेगन कायम मानसिक तणावात होत्या. त्यांनी पहिल्यांदा वैद्यकीय मदत घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागलेले, काही वेळेला तर त्यांना आत्महत्या करण्याचा विचार पण मनात येत असे, त्या उर्णपणे एकाकी झाल्या होत्या, असे अनेक खुलासे यावेळी केले. त्याचप्रमाणे शाही घराण्याने आमचे होणारे बाळ राजपुत्र किंवा राजकन्या होऊ शकत नाही, असे सांगून त्यांना सुरक्षाही नाकारण्यात आली होती, असे त्यानी पुढे सांगितले. मात्र, मुलाच्या वर्णावर केल्या गेलेल्या टिपण्णी बद्दल कोणी, काय चर्चा केली हे सांगणे त्यांनी कटाक्षाने टाळले. जर आम्ही शाही घराण्यातील व्यक्तीचे आम्ही नाव सांगितले तर त्यांची असलेली प्रतिमा मलीन होऊ शकते, असेही त्या म्हणाल्या.
ऑपरा विनफ्रे यांच्या सेलेब्रिटी टॉक शो मध्ये घेतलेल्या ब्रिटीश राजघराण्याचा प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन मर्केल यांची मुलाखत चांगलीच चर्चेत आली असताना या मुलाखतीचा विनफ्रे यांना चांगलाच फायदा झाल्याचे वृत्त मिळाले आहे. एका टीव्ही चॅनलवर ही मुलाखत प्रसारित केली गेली होती. तसेच या चॅनलने विनफ्रे हिला ही मुलाखत प्रसारित करण्याचे अधिकार खरेदी करण्यासाठी ५१ ते ६५ कोटी रुपयांपर्यंत रक्कम अदा केल्याचा रिपोर्ट वॉल स्ट्रीट जर्नलने दिला आहे. या मुलाखतील मेगन हिने ब्रिटीश राजघराण्यातील खाजगी विषयांची चर्चा केल्याने तसेच त्यांनी आपल्या मुलाबद्द्दल वर्णद्वेष करत असल्याचा आरोपही केला होता तसेच प्रिन्स हॅरीचे वडील प्रिन्स चार्ल्स यांचे फोन कधीच उचलत नाहीत असे सांगितले होते. या मुलाखतीमधून अमेरिका आणि ब्रिटन यांच्यात राजकीय संबंध तणावग्रस्त असल्याचे सांगितले गेले आहे. या मुलाखतीचा प्रसारित केलेल्या न्यूज चॅनलला आणि विनफ्रे हिलाही भक्कम रक्कम मिळाली. परंतु, मुलाखतीसाठी प्रिन्स हॅरी आणि मेगन यांना मात्र कोणतेच पैसे दिले गेले नाहीत असेही वक्तव्य केले जात आहे. ६७ वर्षीय असलेली ऑपरा विनफ्रे तिच्या या सेलिब्रिटी टॉक शो होस्ट करण्यासोबत टीव्ही प्रोड्युसर, अभिनेत्री, आणि एक लेखिका म्हणूनही प्रसिध्द आहेत. विनफ्रेचे आयुष्य अतिशय गरीब कुटुंबातून आलेले असून ते संघर्षमय राहिले होते. फोर्ब्स मासिकामध्ये दिलेल्या माहितीनुसार ऑपरा विनफ्रे हिची संपत्ती साधारण १९७०० कोटी रुपये इतकी आहे.