नासाच्या क्युरिओसिटी रोव्हर मंगळ ग्रहावर जीवसृष्टी शोधण्यासाठी फिरताना महत्त्वाची माहिती पाठवली आहे. त्यातून मंगळ ग्रहावर पाण्याचे पुरावे मिळाले आहेत. मंगळावर काही काळासाठी दुष्काळस्थिती तर काही काळासाठी ठराविक प्रमाणात पाणी उपलब्ध असते. ग्रहावरील दगडांच्या आकारावरून तेथे पाणी असल्याचे संकेत मिळाले आहेत. सध्या नासाचा रोव्हर मंगळावरील गेल क्रेटर भागात असलेल्या मोठय़ा दगडावर भ्रमण करत आहे. या रोव्हरने दिलेल्या माहितीनुसार वैज्ञानिकांनी असं अनुमान काढलंय की, शंभर फूट धुळीने बनलेल्या मंगळ ग्रहावर दगडांच्या रचनेत बदल दिसून येत आहेत. तसेच ओली माती आणि त्यावर वाळूची रचना आहे. वादळामुळे या रचनेच्या जागेत बदल झाल्याचे जाणवते. मंगळावर पाणी असल्याचे पुरावे मिळत आहेत. तिथे ओली माती दिसून आली. त्याप्रमाणे दमट वातावरण असू शकते. गेल क्रेटरच्या आतमध्ये पाणी भरले असल्याची शक्यता आहे. नासाला मंगळावर जीवसृष्टी असल्याचे पुरावे मिळण्याची आशा आहे.
सध्या नासाचा रोवर गेल क्रेटर आयोलिस मोन्स नावाच्या एक डोंगरावर आहे. इथल्या आकडेवारीच्या आधारे खगोलशास्त्रांनी असा अंदाज बांधला आहे की, मंगळ ग्रहाच्या खडकांखाली पोत अनेक फूटांपर्यंत वाढ झाल्याचे दिसत आहे. माउंट शार्पच्या तळाशी ओली माती आणि त्यावर वाळूचे ढिगारे दिसून आले आहेत आणि ते वादळ झाल्यानंतर आपला ठाव ठिकाणा बदलताना दिसतात. क्युरिओसिटी रोव्हरने याआधीही मंगळ ग्रहाचा व्हिडीओ पाठवला होता. त्यामध्ये मंगळावरील वादळांचे चित्रण होते. मंगळ ग्रहावर जीवसृष्टी शोधण्यासाठी फिरणाऱ्या नासाच्या क्युरिओसिटी रोव्हरने महत्त्वाची माहिती पाठवली आहे. त्यातून मंगळ ग्रहावर पाण्याचे साठे असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
मंगळाच्या पृष्ठभागावरून नासाचा पर्सिव्हेरन्स रोव्हर फोटो पाठवत असतो. हेलिकॉप्टर इनजीन्यूटीमधून रोव्हरचे विभाजन झाल्यानंतरचे फोटो समोर आले आहेत. हे फोटो पाहून सोशल मीडिया यूझर्सना असं वाटलं की फोटोमध्ये इंद्रधनुष्य दिसत आहे. परंतु मग प्रश्न असा आहे की, जर मंगळ ग्रहावर पाऊसच पडत नसेल तर हा इंद्रधनुष्य तरी कसे काय निर्माण होऊ शकते ! नासाच्या मंगळ प्रोग्रामध्ये काम करत असलेले मार्शल शेपर्ड आणि लॉकहीड मार्टिन कमर्शल सिव्हिल स्पेस ऍडव्हान्स प्रोग्राम्स ची चीफ टेक्नॉलजिस्ट लिसाच्या मते, मंगळावर पाऊस पडत नाही पण ध्रूवावर बर्फ नक्कीच सापडला आहे. मंगळावर वायुमंडळात पाण्याची वाफ आणि बर्फाने ढग बनतात. त्याचवेळी नासाच्या मुख्यालयातून डेव लॅवरी याने मार्शलला सांगितले की, हे इंद्रधनुष्य नसून, हे कॅमेरा लेन्समधील रिफ्लेक्शन आहे.