27 C
Mumbai
Wednesday, September 11, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...
HomeLifestyleब्रेन स्ट्रोक - जागतिक पक्षाघात दिवस

ब्रेन स्ट्रोक – जागतिक पक्षाघात दिवस

२९ ऑक्टोबर हा दिवस  “जागतिक पक्षाघात दिवस” म्हणून साजरा केला जातो. या आजरा बाबत माहिती जनसामान्यांना व्हावी व आजाराची करणे व उपचार पद्धती बाबतीत जागरुकता व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

ब्रेन स्ट्रोक हा गंभीर आजार आहे. कोणत्याही वयातील माणसाला तो होऊ शकतो. सारखी चक्कर येत असेल तर ती कोणत्या कारणांमुळे येते, त्यावर योग्य उपचार पद्धती काय आहे. माणसाच्या प्रत्येक अवयवांवर , हालचालींवर नियंत्रण मेंदूच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. जर त्यामध्येच बिघाड झाला तर संपूर्ण शरीराचे संतुलन बिघडते.

तसेच आपल्याकडे उपचारपध्द्तीने बद्दलचा जनजागृतीचा अभाव असल्याने तसेच विविध आजारांवर भ्रामक संकल्पना आहेत. त्यामुळे योग्य उपचार पद्धत ण अवलंबता घरगुती उपाय करून जेन्वा आजाराचे प्रमाण अंतिम टप्प्यापर्यंत येते तेंव्हा हॉस्पिटलला जातात त्यामुळे अशा मृत्यूदाराचे प्रमाण वाढत आहे.  पक्षाघात झाल्यावर २० ते २५ टक्के लोकांचा मृत्यू होतो तर काही प्रमाणात अपंगत्व येते. अनेकवेळा स्ट्रोक आल्यावर अनेकजण घरगुती उपाय करण्यात वेळ घालवतात व त्यामुळे पक्षाघातात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

आज मोठ्मोठ्या शहरांमध्ये नोकरी अथवा कामधंद्यानिमित्त बरेच जण एकटे राहतात. शहरातील प्रदूषित वातावरण, अपुरी झोप, अनियमित जेवणाच्या वेळा, मोबाईल आणि टेलीविजनचा अतिरिक्त वापर , व्यायामाची कमतरता यामुळे शरीरामध्ये विविध आजार होतात. त्यामुळे कोणताही आजार असला तरी त्यावर योग्य वेळी आणि योग्य उपचार पद्धतीने तो बरा होऊ शकतो.

- Advertisment -

Most Popular