आई माझी काळूबाई हि मालिका सोनी मराठी या वाहिनीवर सुरु असून, त्या मालिकेबद्दल खूप गोष्टी चर्चेत आल्या आहेत. या मालिकेमध्ये प्राजक्ता गायकवाड या प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल – आठल्ये या आहेत. सध्या हि मालिका प्राजक्ता गायकवाड यांनी मालिकेतून अचानक घेतलेल्या एक्झिटमुळे चर्चेत आहे. प्राजक्ताने अचानक मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे सार्वजन आश्चर्य व्यक्त करत आहेत. असे काय घडले कि ज्यामुळे प्राजक्ता गायकवाड या अभिनेत्रीला अशा निर्णयावर पोहोचावे लागले?
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी या झालेल्या प्रकारणाबद्दल आपली काजू मांडत स्पष्टीकरण दिले आहे. “ सहकालाकाराने शिवीगाळ केल्यानेच मी मालिका सोडली” असे प्राजक्ता गायकवाड यांचे स्पष्ट मत आहे. मालिकेतील जेष्ठ अभिनेत्रीच्या मृत्युनंतर निर्मात्या अलका कुबल-आठल्ये यांनी सातारा येथील चित्रीकरण थांबवून मुंबई फिल्म सिटीला चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान सहकलाकार विवेक सांगळे यांनी शिवीगाळ केल्यामुळे मालिका सोडण्याचा निर्णय मी घेत आहे. अनेक ठिकाणी मला मालिकेतून काढल्याची चर्चा होताना दिसते, ती पूर्णत: चुकीची आहे. सहकलाकाराच्या गैरवर्तणुकीमुळे मी मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल – आठल्येयांना रितसर कल्पना दिली आणि मग मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल – आठल्ये यांनी सगळीकडे माझ्या बद्द्दल चुकीची माहिती द्यायला सुरुवात केली, त्यामुळे मला माझी बाजू मांडावी लागली. अलका कुबल – आठल्ये या मला आई सारख्या असून त्या का विवेक संगलेला पाठीशी घालत आहेत याबद्दल माझ्या मनामध्ये विचार सुरु आहेत.
अलका कुबल – आठल्ये यांनी या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. त्यावर चर्चा करून त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर हा वाद मिटवण्याची विनंती केली. सध्या या मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या जागी विना जगताप यांची वर्णी लागली आहे.