मराठी चित्रपटांचा 67 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात बोलबाला पाहायला मिळत आहे. नुकतंच बार्डोनं सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून पुरस्कार पटकावला. त्यानंतर आता राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाची देखील वर्णी लागली आहे. ‘आनंदी गोपाळ’ ने सामाजिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांच्या विभागामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवीला आहे. तसेच या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईनसाठी देखील गौरवण्यात आले आहे.
वर्षभरामध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना या सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात येते. मनोरंजन सृष्टीतील हा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कारामध्ये गणला जातो. गेल्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा कोरोना विषाणूच्या वाढलेल्या संक्रमणामुळे एक वर्षानंतर साजरा केला जात आहे. हा पुरस्कार डायरेक्टोरेट ऑफ फ़िल्म फेस्टिवल या संस्थेमार्फत दिला जातो. माहिती व प्रसारण मंत्रालया अंतर्गत ही संस्था काम करते. तसेच राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जात असल्याने या पुरस्कारास अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. 2019 या वर्षात प्रदर्शित झालेल्या सर्वच चित्रपटांना या पुरस्कार सोहळ्यात विविध विभागामध्ये गौरवण्यात येणार आहे. खर पाहता, मागील वर्षी २०२० सालच्या मे महिन्यामध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येणार होता. परंतू, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या धोक्यामुळं त्याचे नियोजन शकलं नाही. विजेत्यांना या ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले होते. ज्यानंतर सर्व विजेत्यांसाठी राष्ट्रपतींकडून चहापानाच्या कार्यक्रमाचं विशेष आयोजनही करण्यात आलं होतं.
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणाऱ्या डॉ.आनंदीबाई जोशी यांच्या खडतर जीवनपटाचे वर्णन या चित्रपटामध्ये केलेले आहे. आनंदीबाईनी अतिशय कठीण परिस्थितीतसुद्धा येणाऱ्या संकटांवर मात करून वेळप्रसंगी अगदी समाजाचा द्वेष पत्करूनदेखील त्यांनी आपले शिक्षण सोडले नाही आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर बनण्याचा मान त्यांनी पटकावला. ज्या शतकामध्ये स्त्रियांना चूल आणि मुल एवढच स्तिमित आयुष्य होत तेंव्हा त्यांनी उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवण्याचं धाडस दाखविले. आनंदी गोपाळ जोशी अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी एकोणिसाव्या शतकात गेल्या होत्या. चार वर्ष परदेशात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतरचं त्या भारतामध्ये परतल्या. आनंदी गोपाळ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचा हा सर्व चांगला वाईट जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
नुकतेच ६७वा राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. त्यात ‘जक्कल’ या मराठी माहिती पटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट इन्वेस्टगेटिव्ह या नामांकना अंतर्गत हा पुरस्कार दिला गेला असून याचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक वाघ यांनी केले आहे. संपूर्ण पुणे शहराला हादरवून सोडणारी घटना, पुणेकरांनी दहा निरपराध लोकांच्या खुनाची मालिका अनुभवलेली. या हत्याकांडांमुळे आणीबाणी काळामध्ये संपूर्ण पुणे शहराला वेठीस धरले गेलेले. राजेंद्र यलाप्पा जक्कल हे हत्याकांड घडवून आणणाऱ्यांचा प्रमुख म्होरक्या होता. ह्या सगळ्या घटनेचा तपास, गुन्ह्याच्या तपासाचा जक्कल वृत्तीचा, कायद्याचा ससेमिरा कसा मागे लागतो, ते सर्व या शोधात्मक महितीपटामधून करण्यात आलेला आहे. तसेच या माहितीपटावरील वेब सीरिज देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
भारत सरकारच्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अख्त्यारित येणाऱ्या Directorate of Film Festivals या संस्थेतर्फे दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर चित्रपट पुरस्कारांचं वितरण करण्यात येतं. यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं हे 67 व वर्ष. केंद्राकडून विजेत्यांची नावही जाहीर करण्यात आली आहेत. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून मिळाला तो बार्डो या चित्रपटाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी सांगितले कि, हा पुरस्कार खरंच एक प्रकारची ताकद देऊन जाणारा आहे. या चित्रपटाची कथा मी लिहिली असून, पटकथा मी आणि श्वेता पेंडसे लिखीत आहे. हा चित्रपट दोन वर्षांपूर्वीच तयार झालेला आहे, तसेच तो प्रदर्शितही करावयाचा आहे. पण या चित्रपटासाठी मिळणाऱ्या पुरस्कारांची सुरूवात राष्ट्रीय पुरस्काराने व्हावी असं वाटत होतं आणि ते स्वप्न आता पूर्ण झालं. हा पुरस्कार मिळाल्याचं खुप खूप समाधान आहे. येत्या काही महिन्यामध्ये हा चित्रपट आम्ही रिलीज करू, या चित्रपटांत अंजली पाटील, मकरंद देशपांडे, अशोक समर्थ हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत. तसेच या चित्रपटासाठी गायन केलेल्या रान पेटलं साठी गायिका सावनी रवींद्र हिला सुद्धा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
विशेष गोष्ट अशी की यंदा राष्ट्रीय पुरस्कारासाठीच्या समितीचे अध्यक्षपद दिग्दर्शक एन चंद्रा यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. याशिवाय बॉलीवूड मधील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी कंगना राणावत, मनोज वाजपेयी या कलाकारांना देखील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच कोकणी भाषिक चित्रपट काजरोला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या मिळालेल्या पुरस्कारामुळे कोकणी चित्रपटसृष्टीला एक प्रकारचे बळ मिळायला काहीच हरकत नाही.