HomeRatnagiriआता दापोलीचा विकास कोणीही रोखू शकणार नाही : ना. योगेश कदम

आता दापोलीचा विकास कोणीही रोखू शकणार नाही : ना. योगेश कदम

विविध विकासकामांसाठी तब्बल ७ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

दापोली नगरपंचायतीच्या सत्ताधारी व आपल्यामध्ये सुसंवाद नव्हता, त्यामुळे नगरपंचायतीकडून कोणतेही विकास कामांचे प्रस्ताव आपल्यापर्यंत आले नाहीत. मात्र दापोली शहराच्या विकासासाठी सत्ताधारी नगरसेवकांनी शिवसेनेची कास धरली व त्यानंतर दापोली शहरामध्ये विकासपर्व सुरू झाले असून दापोलीचा विकास आता कोणीही रोखू शकत नाही, असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांनी व्यक्त केले. दापोली शहरातील प्रभाग क्र. ३, ६, ७, १०, १२, १४ मधील आरसीसी गटात बांधकाम, नाला चॅनलाईज, रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, पुल नुतनीकरण, बंदिस्त गटार अशा विविध विकासकामांसाठी तब्बल ७ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले असून या कामांचे भूमिपूजन राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दापोलीच्या नगराध्यक्षा सौ. कृपा घाग, उपनगराध्यक्ष खालीद रखांगे, शहरप्रमुख प्रसाद रेळेकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, तालुकाप्रमुख उन्मेष राजे, भगवान घाडगे, माजी तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेठकर, माजी नगरसेवक प्रकाश साळवी, युवासेना शहरप्रमुख बाबू पारकर, नगरसेवक संतोष कळकुटके, विलास शिगवण, शिवानी खानविलकर, रिया सावंत, अश्विनी लांजेकर, माजी जि. प. अध्यक्ष रोहिणी दळवी, माजी नगराध्यक्ष रसिका पेठकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सुधीर कालेकर, माजी सभापती प्रकाश कालेकर, माजी शहरप्रमुख सुहास खानविलकर, शबनम मुकादम, प्रिती शिर्के, किर्ती परांजपे, भाऊ मोहिते यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आपल्या मनोगतात राज्यमंत्री ना. योगेश कदम म्हणाले की, आपण विकासकामांमध्ये कोठेही राजकारण केले नाही. गेली अनेक वर्षे विकासाचा जो बॅकलॉग दापोली मतदार संघात झाला आहे तो आपल्या मंत्रीपदाच्या कारर्कीदीत भरून काढण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. दापोली शहर हे गेली काही वर्षे पर्यटनाच्या माध्यमातून विकसित होत असून या विकसित होत असलेल्या शहरामध्ये अनेक गोष्टींची वाणवा होती, आपण हे सर्व भरून काढण्याचा प्रयत्न करत असून विविध विकासकामे शहराम ध्ये करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. दापोलीतील स्मशानभूमीसाठी आपण २ कोटी रुपये मंजूर केले असून दापोली शहराची संडिघर येथील धरणावरून होणारी नळपाणी योजना प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे डंम्पिंग ग्राऊंड, नाट्यगृह, सुसज्ज मार्केट अशा विविध संकल्पना यापुढे दापोली शहरात राबविण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. या प्रयत्नांना दापोलीकरांची साथ देखील गरजेची असून दापोलीकर निश्चितच आपल्यावर विश्वास ठेवतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments