जर तुम्ही वनप्लसचा प्रीमियम आणि शक्तिशाली स्मार्टफोन ‘OnePlus 15R’ खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या खिशाला आता थोडा जास्त भार सोसावा लागणार आहे. भारतात आपल्या दमदार परफॉर्मन्समुळे अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या फोनच्या किमतीत कंपनीने पुन्हा एकदा मोठी वाढ केली आहे. विशेष म्हणजे, डिसेंबर २०२५ मध्ये लाँच झाल्यापासून या फोनच्या किमतीत तब्बल ७,००० रुपयांची एकूण वाढ झाली आहे.
किमतीत नेमकी किती वाढ झाली?
हा फोन जेव्हा भारतीय बाजारपेठेत दाखल झाला होता, तेव्हा त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत ४७,९९९ रुपये होती. मात्र, आता कंपनीने यामध्ये नवीन दरवाढ केली आहे.
-
12GB RAM + 256GB स्टोरेज (बेस मॉडेल): या मॉडेलची सुरुवातीची किंमत ४७,९९९ रुपये होती. आधी यामध्ये २५०० रुपयांची वाढ झाली आणि आता पुन्हा ४,५०० रुपयांची वाढ झाल्यामुळे हा फोन थेट ५४,९९९ रुपयांना मिळणार आहे.
-
12GB RAM + 512GB स्टोरेज (टॉप मॉडेल): ५२,९९९ रुपयांना लाँच झालेला हा व्हेरिएंट आता ५९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.
या फोनच्या नवीन किमती वनप्लसची अधिकृत वेबसाईट आणि ॲमेझॉन इंडियावर अपडेट करण्यात आल्या आहेत.
किंमत वाढण्याचे कारण काय?
वनप्लसने या दरवाढीबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारपेठेत रॅम (RAM) आणि अंतर्गत स्टोरेजसाठी लागणाऱ्या मेमरी घटकांच्या (DRAM आणि NAND) किमती प्रचंड वाढल्या आहेत. यामुळेच कंपनीला हा आर्थिक भार ग्राहकांवर टाकावा लागला आहे.
किंमत वाढली तरी फीचर्स आहेत एकदम ‘कडक’!
जरी या फोनची किंमत वाढली असली, तरी यात मिळणारे फीचर्स आजही या किमतीत सर्वोत्तम मानले जातात:
-
जगातील पहिला Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर: या फोनमध्ये क्वालकॉमचा अत्यंत वेगवान आणि शक्तिशाली ३nm स्नॅपड्रॅगन ८ जेन ५ प्रोसेसर दिला आहे, ज्यामुळे हेवी गेमिंग आणि मल्टीटास्किंग अगदी लोण्यासारखे चालते.
-
१६५Hz चा सुपर स्मूथ डिस्प्ले: फोनमध्ये ६.८३ इंचाचा १.५K AMOLED डिस्प्ले आहे, जो १६५Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. गेमर्ससाठी हा डिस्प्ले एक उत्तम पर्वणी आहे.
-
७,४००mAh ची अवाढव्य बॅटरी: वनप्लसच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बॅटरी असून ती ८०W SUPERVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. एकदा चार्ज केल्यावर हा फोन आरामात दोन दिवस चालू शकतो.
-
कॅमेरा परफॉर्मन्स: फोटोग्राफीसाठी यात ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा (Sony IMX906) ओआयएस (OIS) सपोर्टसह मिळतो. तसेच, सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो ४K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.
-
मजबूत डिझाइन: धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी या फोनला IP66, IP68 आणि IP69 सारखे सर्वोच्च रेटिंग मिळाले आहे.
दरवाढीमुळे बजेट थोडे बिघडणार असले, तरी ज्यांना दीर्घकाळ चालणारी बॅटरी आणि गेमिंगसाठी हाय-एंड परफॉर्मन्स हवा आहे, त्यांच्यासाठी OnePlus 15R अजूनही एक उत्तम पर्याय ठरतो.
