गोव्यातील नौका जप्त ‘मत्स्य’ची कारवाई

ड्रोन सर्व्हेलन्स मोहिमेत हा प्रकार उघड झाला.

Must read

पर्ससीन’ पद्धतीने बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या गोव्यातील नौकेवर जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाने काल (ता. १३) कारवाई केली. ड्रोन सर्व्हेलन्स मोहिमेत हा प्रकार उघड झाला. याबाबत मत्स्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील ‘हॉली क्रॉस IV’ (नोंदणी IND.GA.०१.MM.२६४०) ही मच्छीमार नौका महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. ड्रोनच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत नौकेवर पाळत ठेवली होती. स्थानिक मच्छिमारांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाची गस्ती नौकानवदुर्गाद्वारे गोव्यातील त्या नौकेचा पाठलाग करण्यात आला. रात्री ९ च्या सुमारासहॉलीक्रॉस IV ही नौका प्रत्यक्ष पर्ससीन’ पद्धतीने बेकायदेशीर मासेमारीकरताना रंगेहाथ पकडली. ही कारवाईपरवाना अधिकारी पार्थ तावडे (साखरी नाटे), चिन्मय जोशी (रत्नागिरी) यांच्या नेतृत्वाखाली केली.

नौका विभागाच्या ताब्यात घेऊनसाखरीनाटे (ता. राजापूर) येथील बंदरात जप्त करून ठेवली असून, नौकेवर कारवाईचा प्रस्ताव दाखल करण्यात येत आहे. ही संपूर्ण कारवाईसह आयुक्त मत्स्यव्यवसाय (सागरी) महेश देवरे, प्रादेशिक उपआयुक्त मत्स्य व्यवसाय नागनाथ भादुले, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सागर कुवेसकरयांच्या मार्गदर्शनाखाली केली. मोहिमेतयेथील सुरक्षारक्षक पर्यवेक्षक तुषार करंगुटकर, साखरी नाटे येथील सुरक्षारक्षक पर्यवेक्षक पुरुषोत्तम घावाळी तसेच रत्नागिरी सुरक्षारक्षक पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. कारवाईचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्या नौकेबाबतची सुनावणीरत्नागिरीचे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाययांच्याकडे घेण्यात येणार आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article