Homekhedkhedआकाशात झेपावणार तेजस, मिराज, राफेल व सुखोई

आकाशात झेपावणार तेजस, मिराज, राफेल व सुखोई

पाटीदार भवनशेजारील मैदानात हा थरार अनुभवायला मिळणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी खेड लायन्स क्लब व शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खेड येथे ‘एरो मॉडेलिंग शो’चे आयोजन केले आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत पाटीदार भवनशेजारील मैदानात हा थरार अनुभवायला मिळणार आहे. ‘ एरी मॉडेलिंग शो’ विषयी माहिती शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मिलिंद इवलेकर, रोहन विचारे, अभिनय महाजन, शैलेश धारिया पाटील, प्रसाद राजवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते. या शोमध्ये भारतीय वायुसेनेची शान असलेली मिराज २०००, तेजस, राफेल आणि सुखोई ३० ही चार आरसी (रिमोट कंट्रोल) फायटर विमाने प्रत्यक्ष मैदानातून आकाशात झेपावणार आहेत.

अवघ्या ५० ते २०० फूट उंचीवर होणाऱ्या या विमानांच्या कसरती प्रेक्षकांचे डोळे दीपवून टाकतील, असे तोडकरी यांनी सांगितले तसेच ज्या विद्यार्थ्यांना स्वतः विमान बनवण्याची आवड आहे अशा जिज्ञासूंसाठी केवळ ५०० रुपयांत तीन उडणाऱ्या विमानांचा संच मर्यादित स्वरूपात उपलब्ध करून दिला जाणार असून, एरो मॉडेलिंग या छंदाची सुरुवात कशी करावी याचे सविस्तर मार्गदर्शनही या वेळी केले जाईल. विद्यार्थ्यांमध्ये वायूसेनेबद्दल कृतज्ञता निर्माण व्हावी आणि विमानांमागील विज्ञान सोप्या भाषेत समजावे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे तोडकरी यांनी सांगितले. आज हा शो पाहणारा खेडमधील एखादा विद्यार्थी भविष्यात वायूसेनेचा पायलट किंवा इंजिनिअर होऊ शकतो, असा विश्वास लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगांवकर यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments