Homekhedमुंबई बळकावण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू - विनायक राऊत

मुंबई बळकावण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू – विनायक राऊत

भविष्यात राजकीय समीकरणे कशी बदलतील हे आताच सांगता येणार नाही.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला मुंबईचा महापौर कशासाठी हवा होता, हे आता सिद्ध झाले असून, मुंबई हडप करण्याची सुरुवात आतापासूनच झाली आहे, असा आरोप उद्धव ठाकरे सेनेचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. मुंबई बळकावण्याचा हा भाजपचा डाव असून, उद्धव ठाकरे सेना आणि मनसे याला कडाडून विरोध करेल, असा इशाराही येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी दिला. राऊत म्हणाले, मुंबई महापालिकेत भाजपला आपली जागा कळली आहे. त्यांना आता एकनाथ शिंदे यांची गरज नाही. भाजपच लवकरच शिंदेंच्या सत्तेची भाकरी फिरवेल आणि त्यांना सत्तेबाहेरचा रस्ता दाखवेल. मुंबईतील ‘बिहार भवन’च्या प्रस्तावावरून टीकेवरून त्यांनी खरमरीत उत्तर दिले. राऊत म्हणाले, उत्तर प्रदेश भवन आधीच वांद्रे येथे झाले आहे आणि आता बिहार भवनचा घाट घातला जात आहे. इतकेच नव्हे, तर गुजरात भवनसाठी पूर्णपणे पालघर जिल्हा देऊ केला आहे.

उद्या बीकेसीमध्ये गुजरात भवन उभे राहिले, तरी नवल वाटायला नको. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अत्यंत घाणेरडे राजकारण सुरू आहे. भाजप आणि शिंदे गट एकमेकांचे उमेदवार पळवत असल्याचा दावा त्यांनी केला. आमच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असून, या नगरसेवकांवर सत्ताधाऱ्यांच्या ‘गिधाडांची टोळधाड’ लक्ष ठेवून आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही नगरसेवकांची बैठक घेतली असून, आमचे नगरसेवक कोणत्याही हॉटेलमध्ये नसून ते सुरक्षितपणे आपल्याच पदाधिकाऱ्यांच्य घरी बैठक करत आहेत. नगरसेवकांचे संरक्षण करणे हे आमचे काम असून ते आम्ही चोख बजावत आहोत. ‘चोराच्या मनात चांदणं’ अशी शिंदेंची अवस्था झाली आहे. त्यांनी दुसऱ्यांची माणसे फोडली आहेत, त्यामुळे आता आपलीही माणसे फुटतील याची भीती त्यांना सतावत आहे. शिंदेंचे नगरसेवक गद्दारी करू शकतात, मात्र उद्धव ठाकरे यांचा आमच्या नगरसेवकांवर पूर्ण विश्वास आहे.

मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत – भविष्यात राजकीय समीकरणे कशी बदलतील हे आताच सांगता येणार नाही. मात्र, उद्धव ठाकरे म्हणाल्याप्रमाणे देवाच्या मनात असेल, तर सर्वच चांगलं होईल, असे सांगत त्यांनी आगामी काळात मोठ्या घडामोडींचे संकेत दिले आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments