भारताच्या युवा संघाने बुधवारी अफगाणिस्तानच्या युवा संघावर सात विकेट व ५३ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आणि टी २० विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताच्या युवा संघाने टी-२० विश्वकरंडकातील सर्वाधिक ३११ धावांचा विक्रमी पाठलाग करीत विजयी लक्ष्य ओलांडले. अॅरोन जॉर्जची ११५ धावांची शतकी खेळी भारताच्या युवा संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. वैभव सूर्यवंशी (६८ धावा) व कर्णधार आयुष म्हात्रे (६२ धावा) या आयपीएल स्टार्सची अर्धशतकी खेळींनी भारतीय युवा संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शतकवीर अॅरोन जॉर्जची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. भारताच्या युवा संघाने सलग सहाव्यांदा १९ वर्षांखालील विश्वकरंडकाची अंतिम फेरी गाठली. तसेच दहाव्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात त्यांना यश मिळाले. अफगाणिस्तानच्या युवा संघाचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. आता येत्या शुक्रवारी होत असलेल्या अजिंक्यपदाच्या लढतीत भारताच्या युवा संघासमोर इंग्लंडच्या युवा संघाचे आव्हान असणार आहे. भारतीय अफगाणिस्तानकडून संघासमोर ३११ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. वैभव सूर्यवंशी व अॅरोन जॉर्ज या सलामी जोडीने ९० धावांची भागीदारी करताना आश्वासक सुरुवात केली.
वैभव सूर्यवंशी याने नेहमीच्या आक्रमक शैलीत फलंदाजी करताना ३३ चेंडूंमध्ये नऊ चौकार व चार षटकारांसह ६८ धावांची खेळी साकारली. त्याला या खेळीमध्ये जीवदानही मिळाले. नूरीस्तानी ओमरजाईच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. आयुष आला फॉर्ममध्ये कर्णधार आयुष म्हात्रे याच्या फलंदाजी फॉर्मबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. या लढतीत तेही महत्त्वाच्या सामन्यात त्याने अॅरोन जॉर्जसोबत ११४ धावांची भागीदारी करताना स्वतःचा फलंदाजी फॉर्मही मिळवला. आयुष म्हात्रे याने ५९ चेंडूंमध्ये ६२ धावांची खेळी केली. नूरीस्तानी ओमरजाईच्याच गोलंदाजीवर तो बाद झाला. ११५ धावांची निर्णायक खेळी सलामीवीर अॅरोन जॉर्जच्या बॅटमधून धावा निघत नाहीत असा सूर उमटू लागला होता; पण उपांत्य फेरीच्या निर्णायक लढतीत त्याने १०४ चेंडूंमध्ये ११५ धावांची खेळी साकारताना आपली धमक दाखवून दिली. त्याने आपली खेळी १५ चौकार व दोन षटकारांनी सजवली. तो बाद झाल्यानंतर विहान मल्होत्रा (नाबाद ३८ धावा) व वेदांत त्रिवेदी (नाबाद ५ धावा) या जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
आयुष आला फॉर्ममध्ये – कर्णधार आयुष म्हात्रे याच्या फलंदाजी फॉर्मबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. या लढतीत तेही महत्त्वाच्या सामन्यात त्याने अॅरोन जॉर्जसोबत ११४ धावांची भागीदारी करताना स्वतःचा फलंदाजी फॉर्मही मिळवला. आयुष म्हात्रे याने ५९ चेंडूंमध्ये ६२ धावांची खेळी केली. नूरीस्तानी ओमरजाईच्याच गोलंदाजीवर तो बाद झाला.
११५ धावांची निर्णायक खेळी – सलामीवीर अॅरोन जॉर्जच्या बॅटमधून धावा निघत नाहीत असा सूर उमटू लागला होता; पण उपांत्य फेरीच्या निर्णायक लढतीत त्याने १०४ चेंडूंमध्ये ११५ धावांची खेळी साकारताना आपली धमक दाखवून दिली. त्याने आपली खेळी १५ चौकार व दोन षटकारांनी सजवली. तो बाद झाल्यानंतर विहान मल्होत्रा (नाबाद ३८ धावा) व वेदांत त्रिवेदी (नाबाद ५ धावा) या जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दोन शतकी खेळी – अफगाणिस्तानकडून प्रथम फलंदाजी करताना चार बाद ३१० धावा उभारण्यात आल्या. फैसल शिनोजादा याने ११० धावांची आणि उझेरुल्ला नियाजाई याने नाबाद १०१ धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक : अफगाणिस्तान ५० षटकांत चार बाद ३१० धावा (उस्मान सादत ३९, खालिद अहमदजाई ३१, फैसल शिनोजादा ११०, उझेरुल्ला नियाजाई नाबाद १०१, कनिष्क चौहान २/५५) पराभूत वि. भारत – ४१.१ षटकांत तीन बाद ३११ धावा (अॅरोन जॉर्ज ११५, वैभव सूर्यवंशी ६८, आयुष म्हात्रे ६२, विहान मल्होत्रा नाबाद ३८, नूरीस्तानी ओमरजाई २/६४).

