HomekonkanChiplun…तर मग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या! रामदासभाई कदमांच्या मागणीने खळबळ

…तर मग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या! रामदासभाई कदमांच्या मागणीने खळबळ

ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या घटनांमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या घटनांमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे मत शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले. खेड तालुक्यातील जामगे येथे आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत निवडणूक आयोगाच्या नियोजनावर थेट नाराजी व्यक्त केली. रामदास कदम म्हणाले की, निवडणूक ही लोकशाहीची पवित्र नियोजन होत नसेल, तर पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात काहीही हरकत नाही. ईव्हीएम मशीनबाबत सध्या जनतेमध्ये संभ्रमांचे वातावरण निर्माण झाले असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास ईव्हीएमबाबत निर्माण झालेला संभ्रम कायमचा दूर होईल आणि मतदारांचा विश्वास अधिक बळकट होईल.

रामदास कदम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, निवडणूक आयोगाने एकतर ईव्हीएम मशीन बंद पडणार नाहीत याची पूर्ण खबरदारी घ्यावी, अन्यथा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा निर्णय घ्यावा. याबाबत निवडणूक आयोगाकडे अधिकृत मागणी करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे अनेक ठिकाणी मतदान प्रक्रियेला विलंब झाला असून, याचा थेट परिणाम मतदारांच्या उत्साहावर होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. लोकशाहीच्या विश्वासार्हतेसाठी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, विश्वासार्ह आणि सुरळीत असणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments