HomekonkanChiplunप्रशासनात अजित पवारांसारखी 'आदरयुक्त भीती' निर्माण करा

प्रशासनात अजित पवारांसारखी ‘आदरयुक्त भीती’ निर्माण करा

अजित पवार यांनी १६ नगरसेवक दिले म्हणून आम्ही त्यांना उपमहापौरपद दिले.

निवडणुकांच्या धावपळीतून विसावा घेण्यासाठी कोकण दौ-यावर आलो. प्रशासन सहजासहजी कोणाला जुमानत नाही, त्यासाठी अजित पवार यांनी आपल्या कामातून प्रशासनात एक आदरयुक्त भीती निर्माण केली तशीच भीती तुम्हालाही निर्माण करावी लागेल, असा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुनेत्रा पवार यांना दिला. तीन महिन्यांपासून निवडणुकांच्या धामधुमीत व्यस्त असलेले मंत्री चंद्रकांत पाटील सध्या दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी पावस येथे आले आहेत. या वेळी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, ‘सांगली महापालिकेत शिवसेनेच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या याद्यांमुळे युती झाली नाही उलट भाजपला पाडण्याचे काम झाले. राजकारणात संधी महत्त्वाची असते. अजित पवार यांनी १६ नगरसेवक दिले म्हणून आम्ही त्यांना उपमहापौरपद दिले, दोन नगरसेवक असणाऱ्यांना काय देणार? असा सवाल उपस्थित करत “कोणी कोणाला फसवले याचा १० वर्षांचा इतिहास पाहिला तर प्रत्येकाने कोणाला तरी फसवले आहेच, असा टोला त्यांनी लगावला.’ मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन फसलेले नाही, अशी भूमिका घेत पाटील यांनी सकारात्मक भाष्य केले. मराठवाड्यात हैदराबाद गॅझेटनुसार अनेक कुणबी नोंदी मिळाल्या आहेत हे मान्य करत त्यांनी सांगितले की, एका नोंदीमुळे ३०० प्रमाणपत्रे निघू शकतात; मात्र, या नोंदी वैयक्तिक स्तरावर कशा न्यायच्या हा कायदेशीर विषय असून त्यावर निर्णय होणे बाकी आहे.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा त्यांचा अंतर्गत विषय आहे. अंतर्गत वादात इतरांनी पडण्याची गरज नाही. ते त्यांचे प्रश्न स्वतः सोडवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्यातील बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई झाली पाहिजे बांगलादेशी पुण्यातील बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावर पाटील यांनी अत्यंत गंभीर विधान केले. ‘पुण्यातील फर्ग्यूसन रोडवरील ९० टक्के फेरीवाले ब आहेत. हे लोक स्थानिक मुलींशी गैरवर्तन करतात आणि त्यातून ‘लव्ह जिहाद’ सारखे प्रकार घडतात,’ असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथा शिंदे यांनी घुसखोरांवर कारवाईचे जे आदेश दिले आहेत त्याचे स्वागत करत घुसखोरांना बाहेर काढण्याची प्रक्रिय अधिक सोपी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

रोहित पवार यांनी मुळापर्यंत जावे – रोहित पवार यांनी केलेल्या घातपाताच्या आरोपांवर पाटील म्हणाले, त्यांनी केवळ माध्यमांसमोर आरोप न करता सत्य शोधण्यासाठी मुळापर्यंत जावे. संबंधित एजन्सीवर गुन्हा दाखल करायला हवा तर त्यातून काहीतरी पुढे येईल. माध्यमांपुढे मांडून त्याचा फारसा उपयोग होणार नाही.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments