HomeRatnagiriदहावीच्या पहिल्या पेपरला २५ विद्यार्थ्यांची दांडी…

दहावीच्या पहिल्या पेपरला २५ विद्यार्थ्यांची दांडी…

यंदा दहावी परीक्षेसाठी एकूण २ हजार ५९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

चिपळूण तालुक्यात दहावीच्या परीक्षेलाही शुक्रवारपासून शांततेत सुरुवात झाली. एकूण १५ केंद्रांवर सुरू झालेल्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी २५ विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असून, सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्यात आला आहे. यंदा दहावी परीक्षेसाठी एकूण २ हजार ५९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी मराठी माध्यमातून २ हजार ४२९ विद्यार्थी असून, पहिल्या मराठी पेपरला २३ विद्यार्थी अनुपस्थित होते. उर्दू माध्यमातून १६७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यांपैकी २ विद्यार्थी गैरहजर राहिले. अशा प्रकारे पहिल्याच दिवशी २५ विद्याथ्यर्थ्यांनी पहिला पेपर दिला नाही, तर २ हजार ५७१ विद्यार्थी शिक्षणातील महत्त्वाच्या टप्प्याकडे वाटचाल करत परीक्षेला सामोरे गेले. परीक्षा केंद्र परिसरात शांतता राखण्यात आली होती. गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक व तपास पथके सतर्क होती. मंडळाच्या आदेशानुसार, सर्व केंद्रांवर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली परीक्षा घेण्यात येत असून, कॉपीमुक्त व शांततेत पहिला पेपर पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था – दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. एका केंद्रावर एका दिव्यांग विद्यार्थ्यासाठी लेखनिकाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वतंत्र बैठक व्यवस्था व पेपर सोडवण्यासाठी अतिरिक्त एक तास देण्यात आला.

खेडमधील दोन केंद्रे चिपळूणला जोडली – तालुक्यात अलोरे, असुडें-आंबतखोल, भोम, युनायटेड हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, धामणंद, कामथे-टेरव, खेर्डी-सती, रामपूर, सावर्डे, वहाळ, आंबडस, परांजपे, मिरजोळी आणि पेढे-परशुराम या १५ केंद्रांवर परीक्षा सुरू आहे. यावर्षी केंद्रांच्या पुनर्रचनेनुसार खेड तालुक्यातील धामणंद व आंबडस ही दोन केंद्रे चिपळूण तालुक्याला जोडण्यात आली असून, चिपळूणमधील मार्गताम्हाणे हे केंद्र गुहागर तालुक्याशी संलग्न करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments