३ इडियट्स २ कन्फर्म! आमिर खानने दिली सिक्वेलबद्दल मोठी अपडेट, स्क्रीप्ट तयार

राजकुमार हिरानी आणि आमिर खान पुन्हा येणार एकत्र; १० वर्षांनंतरची कथा मांडणार '३ इडियट्स'चा सिक्वेल.

Must read

२००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘३ इडियट्स’ (3 Idiots) या सिनेमाने भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास रचला होता. रँचो, राजू आणि फरहान या तिघांच्या मैत्रीने आणि त्यातील ‘ऑल इज वेल’च्या मंत्राने अवघ्या देशाला वेड लावले होते. तेव्हापासूनच चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता खुद्द ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानने (Aamir Khan) याबद्दल एक मोठी अपडेट दिली असून, चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचे संकेत दिले आहेत.

नेमकं काय म्हणाला आमिर खान?

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आमिर खानने ‘३ इडियट्स’च्या सिक्वेलबाबत मौन सोडले. त्याने सांगितले की, या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची कथा (Story) आणि स्क्रीप्टवर सध्या काम सुरू आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी आमिरला कथेचा सारांश ऐकवला असून आमिरला ती प्रचंड आवडली आहे. आमिर म्हणाला, “राजू (राजकुमार हिरानी) या चित्रपटावर काम करत आहेत. मी कथा ऐकली असून ती अतिशय सुंदर आणि हटके आहे. पहिल्या भागाप्रमाणेच यामध्येही विनोदी शैली पाहायला मिळेल.”

१० वर्षांनंतरची गोष्ट?

मिळालेल्या माहितीनुसार, हा सिक्वेल पहिल्या भागाच्या कथेला पुढे घेऊन जाणारा असेल. चित्रपटामध्ये रँचो, राजू आणि फरहान यांच्या आयुष्यात १० वर्षांनंतर काय घडले, हे पाहायला मिळू शकते. मूळ चित्रपटातील मुख्य कलाकार म्हणजेच आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता आहे. या बातमीमुळे सोशल मीडियावर उत्साहाचे वातावरण असून ‘फुन्सुख वांगडू’ला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

शिक्षणावरील मार्मिक भाष्य आणि मैत्रीचे अतूट नाते यामुळे ‘३ इडियट्स’ आजही तितकाच लोकप्रिय आहे. आता त्याचा पुढचा भाग बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article