बॉलिवूडची ‘बोल्ड आणि ब्युटीफुल’ अभिनेत्री नेहा धुपिया नेहमीच आपल्या सडेतोड मतांसाठी ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नेहाने तिच्या खाजगी आयुष्याबद्दल असा काही खुलासा केला आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
लग्नाआधीच्या प्रेग्नेंसीवर नेहा काय म्हणाली? भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये नेहाने तिच्या आणि अंगद बेदीच्या नात्याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी तिने तिच्या लग्नाआधीच्या प्रेग्नेंसीवर भाष्य करताना म्हटले की, “मी लग्नाआधी प्रेग्नंट झाले, हे माझ्यासाठी देवाचे आशीर्वादच आहेत. खरं तर याच कारणामुळे आम्ही लग्नाचा निर्णय तातडीने घेतला.”
८-१० वर्षे लग्नासाठी नकार, मग कसं जमलं सूत? या मुलाखतीत अंगद बेदीने एक मजेशीर किस्सा सांगितला. तो म्हणाला, “मी जवळपास ८ ते १० वर्षे नेहाच्या मागे होतो, पण तिने मला कधीच होकार दिला नव्हता.” अंगदने नेहाला पहिल्यांदा जिममध्ये ट्रेडमिलवर धावताना पाहिले होते आणि तो तेव्हाच तिच्या प्रेमात पडला होता. नेहाचे मन जिंकण्यासाठी त्याने चक्क तिच्या आईशी मैत्री केली होती.
घाईघाईत उरकलं होतं लग्न २०१८ मध्ये नेहा आणि अंगदने अचानक दिल्लीतील गुरुद्वाऱ्यात गुपचूप लग्न उरकून सर्वांना धक्का दिला होता. लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांतच त्यांनी मुलगी ‘मेहर’च्या जन्माची बातमी दिली. त्याकाळी नेहाला यावरून प्रचंड ट्रोल करण्यात आले होते, पण तिने कधीही या ट्रोलिंगची पर्वा केली नाही. आज हे जोडपे दोन मुलांचे (मेहर आणि गुरिक) आनंदी पालक आहेत.
