काय आहे अमेरिकेची डार्क ईगल सिस्टिम आणि इराणसाठी ती धोक्याची घंटा का आहे? सविस्तर माहिती.

काय आहे अमेरिकेची डार्क ईगल सिस्टिम आणि इराणसाठी ती धोक्याची घंटा का आहे? सविस्तर माहिती.

Must read

गेल्या महिनाभरापासून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव निवळण्याऐवजी अधिकच चिघळताना दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या युद्धविराम (Ceasefire) लागू असला तरी, पडद्यामागे युद्धाची तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. इराणने अमेरिकेच्या धमक्यांना न जुमानता आपली आक्रमक भूमिका कायम ठेवल्याने, आता अमेरिकेने आपले सर्वात घातक आणि आधुनिक शस्त्र ‘डार्क ईगल’ (Dark Eagle) मध्य पूर्वेत तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे डार्क ईगल क्षेपणास्त्र प्रणाली? ‘डार्क ईगल’ हे अमेरिकन सैन्याचे पहिले हायपरसोनिक क्षेपणास्त्र (Hypersonic Missile) आहे. याला तांत्रिक भाषेत ‘लॉन्ग रेंज हायपरसोनिक वेपन’ (LRHW) असेही म्हटले जाते. या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा तब्बल पाच पटीने जास्त आहे. ताशी ६,१७४ किलोमीटर वेगाने हे क्षेपणास्त्र लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते.

हे पाऊल का उचलले? इराणने आपली बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि मोबाइल लाँचर्स अशा ठिकाणी लपवून ठेवले आहेत, जिथे अमेरिकेची सध्याची क्षेपणास्त्रे पोहोचू शकत नाहीत. अमेरिकेच्या सध्याच्या क्षेपणास्त्रांची मर्यादा साधारण ५०० किलोमीटरपर्यंत आहे. मात्र, ‘डार्क ईगल’ची मारक क्षमता २,७८० किलोमीटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे इराणच्या भूमीवरील कोणत्याही कोपऱ्यात लपवलेले तळ उद्ध्वस्त करणे अमेरिकेला शक्य होणार आहे.

रडारलाही चकवा देणार! या क्षेपणास्त्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची ‘ग्लाइड बॉडी’. हे क्षेपणास्त्र हवेत असताना आपली दिशा आणि मार्ग अनपेक्षितपणे बदलू शकते. यामुळे शत्रूचे रडार किंवा एअर डिफेन्स सिस्टिम याला पकडू शकत नाही. जमिनीखालील कमांड सेंटर्स आणि चालते-फिरते मोबाइल लाँचर्स नष्ट करण्यासाठी हे खास बनवण्यात आले आहे.

मध्य पूर्वेतील या घडामोडींमुळे जगाचे लक्ष पुन्हा एकदा या युद्धाकडे लागले आहे. जर परिस्थिती सुधारली नाही, तर ‘डार्क ईगल’चा वापर होऊन युद्धाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article