इराणचा UAE आणि ओमानवर ड्रोन हल्ला; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला!

ट्रम्प यांच्या 'प्रोजेक्ट फ्रीडम' मुळे इराण आक्रमक; तेल डेपोला आग, भारतीय जखमी.

Must read

आखाती देशांमध्ये पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी पडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ अंतर्गत होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची योजना आखली आहे, ज्यावर इराणने तीव्र आक्षेप घेतला आहे. इराणच्या या संतापामुळे संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ओमानमध्ये खळबळ उडाली असून, तेथील तेल डेपो आणि जहाजांवर भीषण ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत.

UAE मधील फुजैराह तेल डेपोवर झालेल्या हल्ल्यामुळे मोठी आग लागली असून, यामध्ये तीन भारतीय जखमी झाल्याचे वृत्त आहे. इराणने ओमानमधील बुखा शहरातही निवासी भागाला लक्ष्य केले. या तणावामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीत सध्या ८०० हून अधिक मालवाहू जहाजे आणि २० हजार खलाशी अडकून पडले आहेत. यामध्ये तेल आणि रसायनांच्या टँकर्सचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

या युद्धाच्या भीतीमुळे जागतिक बाजारपेठेवरही परिणाम झाला असून कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत ४ डॉलरची वाढ होऊन त्या ११४ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. दरम्यान, ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या माध्यमातून इराणला चर्चेच्या टेबलावर आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. १४ मे रोजी ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यापूर्वी हे संकट निवळण्यासाठी अमेरिकेकडून हालचाली केल्या जात आहेत.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article