अरिजीत सिंहनंतर आता इशानी दवेचीही संगीतविश्वातून निवृत्ती? सोशल मीडिया पोस्टने उडवली खळबळ!

प्रसिद्ध गायिका इशानी दवे हिने निवृत्तीचे दिले संकेत; म्युझिक इंडस्ट्रीतील राजकारणावर व्यक्त केली नाराजी.

Must read

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा ‘किंग ऑफ मेलडी’ अरिजीत सिंह याने पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याचे संकेत देऊन चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. ही चर्चा अद्याप शांत झालेली नसतानाच आता आणखी एका लोकप्रिय गायिकेने संगीत क्षेत्र सोडण्याचे संकेत दिल्याने खळबळ उडाली आहे. ही गायिका दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या मधुर आवाजाने तरुणाईला भुरळ घालणारी इशानी दवे (Ishani Dave) आहे.

इशानीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने संगीत उद्योगातील (Music Industry) काही कटू अनुभवांवर भाष्य करत आपली खदखद व्यक्त केली आहे. या पोस्टमुळे ती लवकरच निवृत्ती घेणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

नेमकं काय म्हणाली इशानी? इशानीने तिच्या पोस्टमध्ये संगीत विश्वातील सद्यस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे. तिने म्हटले आहे की, “कधीकधी आपल्याला अशा वळणावर थांबावे लागते जिथे आपली किंमत केली जात नाही. संगीत हे माझ्यासाठी केवळ करिअर नसून आत्मा आहे, पण सध्याच्या इंडस्ट्रीतील वातावरण आणि कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.”

तिच्या या ‘इमोशनल’ पोस्टनंतर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे, तर काहींनी “तुझा आवाज ही आमची गरज आहे, प्लीज असा निर्णय घेऊ नकोस,” अशी विनंतीही केली आहे. अरिजीत सिंहने घेतलेल्या निर्णयापाठोपाठ आता इशानीनेही असे संकेत दिल्याने संगीतप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

इशानी दवे खरोखरच निवृत्ती घेणार की ही केवळ एक भावनिक पोस्ट आहे, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, तिच्या या निर्णयाच्या संकेताने सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article