सुनीता आहुजाचा दारू पिण्यावरून मोठा खुलासा; ट्रोलर्सना दिले सडेतोड उत्तर!

"कोणाच्या बापाच्या पैशाने नाही पिते..." गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाचा स्पष्टवक्तेपणा.

Must read

बॉलिवूडचा ‘नंबर १’ अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता आहुजा ही तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकतीच तिने एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीबद्दल आणि विशेषतः मद्यपानाबद्दल अतिशय रोखठोक मते मांडली आहेत.

सुनीता आहुजा सध्या ‘लाफ्टर शेफ्स’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. या शोमधील तिच्या विनोदी शैलीने आणि बिनधास्त वागण्याने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र, सोशल मीडियावर तिला अनेकदा तिच्या ‘पार्टी लव्हिंग’ स्वभावावरून ट्रोल केले जाते. एका ताज्या संवादात जेव्हा तिला मद्यपानाविषयी विचारण्यात आले, तेव्हा तिने दिलेले उत्तर आता चर्चेचा विषय ठरत आहे.

सुनीता म्हणाली की, “लोक अनेकदा विचारतात की तुम्ही दारू पिता का? त्यावर माझे उत्तर सोपे आहे—हो, मी पिते. पण मी कोणाच्या बापाच्या पैशाने दारू पित नाही, मी माझ्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने पित आहे. मी काही संत किंवा साध्वी नाही, मी एक सामान्य माणूस आहे आणि मला माझे आयुष्य माझ्या अटींवर जगायला आवडते.”

तिच्या या उत्तराने पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे की सुनीता कोणालाही घाबरत नाही. तिने पुढे असेही स्पष्ट केले की, तिला पार्ट्यांमध्ये मजा करायला आणि आनंदी राहायला आवडते. गोविंदाच्या आयुष्यातील चढ-उतारांमध्ये सावलीसारखी उभी राहणारी सुनीता आता तिच्या या नव्या आणि बिंधास्त अवतारामुळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article