कोल्हापूर हादरलं! प्रियकराने फोन न उचलल्याने अल्पवयीन मुलीने स्वतःचेच खाजगी व्हिडिओ केले व्हायरल, तरुण अटकेत

कोल्हापूर क्राईम न्यूज: शिरोळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार; प्रियकरावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, लॉज मालकाचीही चौकशी सुरू.

Must read

प्रेमात पडल्यावर माणूस काय करेल याचा नेम नाही, पण कोल्हापुरातून समोर आलेली एक घटना ऐकून संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. प्रियकराने फोन उचलला नाही आणि तो आपल्याला टाळत आहे, या रागाच्या भरात एका अल्पवयीन प्रेयसीने असे टोकाचे पाऊल उचलले की ज्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. राग अनावर झाल्यामुळे या अल्पवयीन मुलीने स्वतःचे आणि प्रियकराचे खाजगी (अश्लील) व्हिडिओ थेट सोशल मीडियावर व्हायरल केले. या धक्कादायक घटनेनंतर कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, शिरोळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात काही कारणावरून बिनसले होते. मुलगी वारंवार प्रियकराला फोन करण्याचा प्रयत्न करत होती, मात्र प्रियकर तिचा फोन उचलत नव्हता. तो जाणीवपूर्वक तिला टाळत असल्याचा संशय मुलीला आला. वारंवार होणाऱ्या या उपेक्षेमुळे ती प्रचंड संतापली.

याच रागाच्या आणि नैराश्याच्या भरात तिने दोघांचे एकत्र असलेले तीन खाजगी व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले. काही वेळातच हे व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने पसरले.

पोलिसांची तत्पर कारवाई; तरुण जेरबंद हा प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. या संवेदनशील प्रकरणाची दखल घेत शिरोळ पोलिसांनी तात्काळ वेगाने चक्र फिरवली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध पोक्सो (POCSO – बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला तात्काळ अटक केली आहे.

लॉज मालकही रडारवर हे खाजगी व्हिडिओ ज्या लॉजमध्ये चित्रित करण्यात आले होते, तो लॉज आता पोलिसांच्या रडारवर आला आहे. अल्पवयीन मुलांना लॉजमध्ये प्रवेश कसा दिला? तिथे काय काय नियम धाब्यावर बसवले गेले? या सर्व बाबींचा तपास करण्यासाठी शिरोळ पोलिसांनी संबंधित लॉज मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात लॉज मालकावरही कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

क्रोध आणि सोशल मीडियाचा चुकीचा वापर एखाद्याचे आयुष्य कसे उद्ध्वस्त करू शकतो, याचे हे एक विदारक उदाहरण या घटनेच्या निमित्ताने समोर आले आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article